शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

चुहे खा के बिल्ली हज को चली, पाशा पटेल यांची पवारांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2018 6:12 PM

सो चुहे खा के बिल्ली हज को चली अश्या शब्दात राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

पुणे : सो चुहे खा के बिल्ली हज को चली अश्या शब्दात राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. त्यांची तशी नियतही दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत टोकाची भूमिका घेऊन आंदोलन तीव्र करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईत केले होते. त्याला उत्तर देताना पटेल पुण्यात बोलत होते.स्वामिनाथन आयोग तुमच्या काळात आला होता, एवढ्या वर्ष तुम्ही तो का नाही लागू केला असा प्रश्नही पटेल यांनी यावेळी उपस्तिथ केला.त्याचबरोबर शेतकऱ्यांना चिथावणी देण्याची भाषा तुम्हाला शोभत नाही. असेही ते यावेळी म्हणाले. पवार कृषिमंत्री असतानाच्या काळातील चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. तसेच 2022 पर्यंत शेतकऱ्यांना उत्पादन खर्च आणि 50 टक्के नफा देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ती ते पूर्ण करतील. अशी हमी सुद्धा पटेल यांनी यावेळी दिली.पटेल म्हणाले, शरद पवार कृषी मंत्री असताना चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी शेतकरी एका हाकेत रस्त्यावर उतरत होते. तळहातावर केस येईपर्यंतची भाषा करणाऱ्यांनी 10 वर्ष स्वामिनाथन आयोग समोर असताना तो लागू केला नाही. आधीच्या सरकारने जे 40 वर्षात शेतकऱ्यांसाठी केले नाही ते मोदी सरकार 4 वर्षात करत आहे.

टॅग्स :Pasha Patelपाशा पटेल