शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

स्टेमसेल्स प्रिझर्वच्या बहाण्याने फसवणूक, महिलेकडून ६५ हजार उकळले  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 05:20 IST

पुणे : डॉ. चैतन्य कॉर्डलाइफ बायोटेक नावाच्या कंपनीने नवजात बालकाचे भविष्यात होणाºया आजारापासून संरक्षण करण्यासाठी त्याच्या नाळेतील रक्त प्रिझर्व्ह (स्टेमसेल्स) करण्याच्या बहाण्याने एका महिलेकडून ६५ हजार रुपये घेऊन तिची फसवणूक केल्याचा प्रकार कोथरूड परिसरात उघडकीस आला आहे.या प्रकरणी स्मिता गोपाल तिजुरी (वय ६०, रा. मुकुंदनगर, स्वारगेट) यांनी स्वारगेट पोलिसांंकडे फिर्याद ...

पुणे : डॉ. चैतन्य कॉर्डलाइफ बायोटेक नावाच्या कंपनीने नवजात बालकाचे भविष्यात होणाºया आजारापासून संरक्षण करण्यासाठी त्याच्या नाळेतील रक्त प्रिझर्व्ह (स्टेमसेल्स) करण्याच्या बहाण्याने एका महिलेकडून ६५ हजार रुपये घेऊन तिची फसवणूक केल्याचा प्रकार कोथरूड परिसरात उघडकीस आला आहे.या प्रकरणी स्मिता गोपाल तिजुरी (वय ६०, रा. मुकुंदनगर, स्वारगेट) यांनी स्वारगेट पोलिसांंकडे फिर्याद दिली आहे़ डॉ. चैतन्य पुरंदरे याच्यासह दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ मे ते २ जून २००८ या कालावधीत स्मिता तिजुरी यांची मुलगी डिलिव्हरीसाठी स्वारगेट येथील पाटणकर नर्सिंग होम्स येथे दाखल झाली होती. पौड रस्त्यावरील शिलाविहार कॉलनी येथे सुदर्शन अपार्टमेंटमध्ये डॉ. चैतन्य कॉर्डलाइफ बायोटेक कार्यालय होते. त्या वेळी त्यांचा विश्वास संपादन करून डॉ. चैतन्य पुरंदरे आणि त्याच्या साथीदार महिलांनी ‘स्टेमसेल्स’बद्दल महिलेला माहिती दिली. तुमच्या बाळाच्या नाळेतील रक्त प्रिझर्व्ह केल्यास भविष्यात त्याला कोणतेही आजारपण आले तर त्यावर औषध शोधता येऊ शकते. त्यामुळे त्याला संरक्षण मिळेल, असे त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करून स्टेमसेल्स प्रिजर्व करण्याच्या बहाण्याने ६५ हजार रुपये घेण्यात आले.त्यानंतर तिजुरी यांनी ‘स्टेमसेल्स’बद्दल चौकशी केली नाही. दरम्यानच्या काळात डॉ. चैतन्य कॉर्डलाइफ बायोटेकचे कार्यालय बंद करण्यात आले. मात्र याबाबत तिजुरी यांना कळविण्यात आले नाही. काही दिवसांपूर्वी त्यांना डॉ. चैतन्य पुरंदरेने गाशा गुंडाळल्याचे समजले. त्यानुसार त्यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक शंकर खटके अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हा