लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखवून दोघांची तब्बल ४३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी समर्थ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. झहीर कमरू पिराणी (वय ३८, रा. भवानी पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. प्रमोद गुंडू (वय ५३, रा. मार्केट यार्ड) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. प्रमोद गुंडू यांच्या मुलाला भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. झहीर याने एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो, अशी बतावणी करून गुंडू यांच्याकडून २३ लाख रुपये घेतले. तर, त्यांच्या ओळखीच्या नूतन नारायण सावंत (रा. मुंबई) यांच्याकडून २० लाख रुपये घेतले. मात्र, प्रवेश दिला नाही. पुढील तपास उपनिरीक्षक सचिन चव्हाण करीत आहेत.
प्रवेशच्या बहाण्याने फसवणूक
By admin | Updated: May 12, 2017 05:25 IST