शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मोटारींची परस्पर नोंदणी करून लाटले सव्वा कोटी; विमानातळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 18:48 IST

तारण असलेल्या एका कारची परस्पर दुसऱ्या कंपनीकडे नोंदणी करून तसेच आठ कारची परस्पर विल्हेवाट लावून महिंद्रा कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी साई साक्षी कंपनीच्या संचालकांविरूद्ध विमानातळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसाई साक्षी कंपनीच्या संचालकांविरूद्ध विमानातळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलसुधाकर यादव (वय ४१) यांनी दिली फिर्याद; मे २०१५ मध्ये घडला होता प्रकार

पुणे : आठ आलिशान मोटारी घेण्यासाठी मे २०१५ मध्ये साई साक्षी आॅटोमोटिव्ह कार्स प्रा. लिमिटेडच्या संचालकांनी महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कडून सव्वा दोन कोटी रूपयांचे कर्ज घेतले. मात्र कर्जाची उर्वरित रक्कम न भरता महिंद्राकडे तारण असलेल्या एका कारची परस्पर दुसऱ्या कंपनीकडे नोंदणी करून तसेच आठ कारची परस्पर विल्हेवाट लावून महिंद्रा कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी साई साक्षी कंपनीच्या संचालकांविरूद्ध विमानातळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुनीत वादवाणी (रा. डी. ४८, वसंत विहार फुलबाग जवळ, लपकर ग्वालीयर) आणि राकेश राजपाल (रा. २६/३ मनोरमा गंज फ्लॅट नं. ५०, रॉयल हाईट्स, इंदोर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. सुधाकर यादव (वय ४१, रा. सावरकरनगर, ठाणे वेस्ट) यांनी फिर्याद दिली आहे. मे २०१५ मध्ये हा प्रकार घडला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साई साई साक्षी आॅटोमोटिव्ह कार्स प्रा. लिमिटेडचे संचालक पुनीत वादवाणी व राकेश राजपाल यांनी मे २०१५ मध्ये आठ आलिशान कार घेण्यासाठी फिर्यादी यांच्या महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा फायनान्शियल सव्हिसेस लिमिटेड कडून २ कोटी १५ लाख रूपयांचे कर्ज घेतले. कर्जाची काही रक्कमही भरली. मात्र कर्जाची उरलेली १ कोटी १४ लाख ५१ हजार ७९० रूपयांची रक्कम त्यांनी भरली नाही. महिंद्रा फायनान्सकडे तारण असलेल्या आठ कार फिर्यादीला न दाखविता त्यापैकी एका कारची कंपनीच्या परवानगीशिवाय दुसऱ्या कंपनीकडे नोंदणी केली तसेच आठ कारची परस्पर कोठेतरी विल्हेवाट लावून फिर्यादी यांच्या कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक कोलते पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणे