पिंपरी : गतिमंद मुलावर वर्षभरापासून अत्याचार करणाऱ्या एकाला भारतीय जनता पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. वाल्हेकरवाडी, चिंचवडमध्ये बुधवारी दुपारी हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खलील कुणबी शेख (वय २०, चिंचवड) असे अत्याचार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. शेख हा शहरातील एका महाविद्यालयात एफवायबीकॉमचे शिक्षण घेत आहे. शेख हा पीडित मुलाच्या शेजारी राहतो. वर्षभरापासून तो गतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार करीत होता. ही बाब पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर बुधवारी दुपारी खलीलला चोप देत चिंचवड पोलिसांच्या हवाली केले. या वेळी हा प्रकार उघडकीस आणण्यात भाजप वाहतूक आघाडीचे संदीप ढेरंगे, योगेश मालखरे, संगीता सुतार, आशा गायकवाड, चंद्रहास वाल्हेकर यांचा सहभाग होता.(प्रतिनिधी)
गतिमंद मुलावर अत्याचार करणा-यास चोप
By admin | Updated: April 9, 2015 05:15 IST