शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धर्मादाय आयुक्तांचा हुसेनशाहबाबा दर्गा ट्रस्टच्या संचालकांना दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 19:01 IST

येरवडा येथील हुसेनशाहबाबा दर्गा सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. या दर्गा ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या संचालकांनी केलेल्या लाखो रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी या ट्रस्टच्या अध्यक्षासह ४ संचालकांविरुद्ध संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या कार्यवाहीचे आदेश पुण्याच्या सहधर्मादाय आयुक्तांनी नुकतेच दिले.

निखिल गायकवाडपुणे  : येरवडा येथील हुसेनशाहबाबा दर्गा सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. या दर्गा ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या संचालकांनी केलेल्या लाखो रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी या ट्रस्टच्या अध्यक्षासह ४ संचालकांविरुद्ध संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या कार्यवाहीचे आदेश पुण्याच्या सहधर्मादाय आयुक्तांनी नुकतेच दिले. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५०नुसार दि मुस्लिम जमात हुसेनशाहबाबा  ट्रस्टचे अध्यक्ष महेमूद मुनीर खान यांच्यासह  मन्सूर इलाही सय्यद, रज्जाक हुसेन सय्यद, मुस्ताक पापा शेख व नईम करीम सय्यद या चार संचालकांना बरखास्त करण्याची कार्यवाही प्रस्तावित करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते मुझफ्फर इनामदार हे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत होते. सह धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या या आदेशामुळे त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले. याबाबत ट्रस्टच्या अनेक सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे.

तीन वर्षांपासून तक्रारीचा पाठपुरावा

 येरवडा येथील दि मुस्लिम जमात हुसेनशाहबाबा ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या संचालकांनी मागील २७ वर्षांत लाखो रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते मुझफ्फर इनामदार व इतर ११७ सभासदांनी धर्मादाय आयुक्तांकडे तीन वर्षांपूर्वी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी धर्मादाय आयुक्तांनी निरीक्षक राधेश्याम पडलवार यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी चौकशी अहवाल निरीक्षक पडलवार यांनी धर्मादाय उपायुक्तांना सादर केला. याबाबत धर्मादाय उपायुक्तांनी संबंधित संचालकांकडे स्पष्टीकरण मागितले असता त्यांनी दिलेली माहिती ही महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायद्याच्या तरतुदींशी  निराधार व विसंगत स्वरूपाची होती. त्यामुळे बरखास्त करण्याची कार्यवाही प्रस्तावित करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :commissionerआयुक्तYerwadaयेरवडा