शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधाच्या आरोपातून तरुणाचा खून झाल्याचे उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 02:18 IST

अनैतिक संबंधाचा संशय घेऊन त्याची गावभर बोंबाबोंब करून पत्नीला मारहाण करणाऱ्या समजावून सांगण्याच्या प्रयत्नात त्याचा मृत्यू झाला.

पुणे : अनैतिक संबंधाचा संशय घेऊन त्याची गावभर बोंबाबोंब करून पत्नीला मारहाण करणाऱ्या समजावून सांगण्याच्या प्रयत्नात त्याचा मृत्यू झाला. ८ महिन्यांपूर्वी घडलेल्या हा खुनाचा प्रकार ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. त्यांनी त्याच्या मावस भावास अटक केली आहे.दीपक अशोक गोरडे (वय २३, रा. लोंढेमळा, एकलहरे, कळंब, ता. आंबेगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या घटनेत विकास किसन खंडागळे (वय ३०, रा़ मांजरवाडी, खंडागळेमळा, ता़ जुन्नर) याचा ११ एप्रिल २०१८ रोजी खून झाला होता. याबाबत पोलिसांनी सांगितले की, विकास खंडागळे याचा दुसरा विवाह झाला होता. तो वरातीत बेंजो वाजवायचा. त्याला दारूचे व्यसन होते. तो आपल्या पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय घेत असे. त्याची गावभर चर्चा करून बदनामी करत. त्यावरून तो पत्नी व आईला वारंवार मारहाण करीत असत. त्याची पत्नी बाजारासाठी मंचरला आल्यावर कधी तरी त्यांच्या घरी जात असे. तसेच ती आजारी असताना दीपक गोरडे यांनी तिला मोटारसायकलवरून दवाखान्यात नेले होते. यावरून तो त्यांची बदनामी करीत होता. तसेच त्याच्या मित्राची बदनामी करीत होता. दीपक गोरडे यांनी त्याला वारंवार समजावून सांगितले होते. तरीही तो ऐकत नव्हता.११ एप्रिल २०१८ रोजी सायंकाळपासून तो त्याच्या पत्नीला मारहाण करीत होता. तिने फोन करून ही बाब दीपक याला सांगितले. तेव्हा तो त्यांच्या घरी आला. त्याला समजावून सांगण्यासाठी त्याला घेऊन बाहेर नेले. तेथे तो शिवीगाळ करू लागल्याने त्याने विकास याला पट्ट्याने व लाकडी काठीने मित्राच्या मदतीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. तेव्हा त्याला त्यांनी पुन्हा घरी आणून सोडले. व त्याची मोटारसायकल तेथे ठेवून ते निघून गेले होते. ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक निरीक्षक रवींद्र मांजरे, हवालदार दत्तात्रय जगताप, शंकर जम, सुनील जावळे, शरद बांबळे, सी़ बी़ बागेवाडी, दीपक साबळे, अक्षय जावळे यांनी ही कामगिरी केली.

टॅग्स :MurderखूनPuneपुणे