जिल्हा वारकरी मंडळावर तालुक्यातील तीन जणांची वर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:11 IST2021-02-09T04:11:50+5:302021-02-09T04:11:50+5:30

अखिल भारतीय वारकरी मंडळ संलग्न पुणे जिल्हा वारकरी सेवा समितीच्या सदस्यपदी हभप दत्तात्रय महाराज कंक (भुतोंडे, ता. भोर), हभप ...

Character of three persons from the taluka on District Warkari Mandal | जिल्हा वारकरी मंडळावर तालुक्यातील तीन जणांची वर्णी

जिल्हा वारकरी मंडळावर तालुक्यातील तीन जणांची वर्णी

अखिल भारतीय वारकरी मंडळ संलग्न पुणे जिल्हा वारकरी सेवा समितीच्या सदस्यपदी हभप दत्तात्रय महाराज कंक (भुतोंडे, ता. भोर), हभप दत्तात्रय महाराज महाडिक (रांजणवाडी, ता. भोर) यांची वारकरी शिक्षण समितीच्या सचिवपदी, हभप डॉ. आनंदा महाराज कंक (ता. भोर) यांची पुणे जिल्हा वारकरी आरोग्य समिती उपप्रमुखपदी निवड झाली. नियुक्तीपत्र प्रदान सोहळा कार्यक्रमात निवड झालेल्या वारकऱ्यांना नियुक्तपत्र देण्यात आले. या कार्यक्रमास हभप कल्याणजी महाराज गायकवाड, हभप शंकर महाराज शेवाळे, हभप आसाराम महाराज बडे, हभप नामदेव महाराज चव्हाण, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, हभप अनिल महाराज वाळके (प्रदेशाध्यक्ष), हभप आनंद महाराज तांबे, आबासाहेब महाराज गोडसे, हभप दत्तात्रय महाराज सोळसकर (पुणे विभागीय अध्यक्ष), हभप सुखदेव महाराज ठाकर (पुणे जिल्हाध्यक्ष) इत्यादी उपस्थित होते.

हभप दत्तात्रय महाराज कंक यांना नियुक्तीपत्र देताना मान्यवर.

Web Title: Character of three persons from the taluka on District Warkari Mandal