शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

काळानुसार चित्रपटांचा चेहरा बदलतोय : शर्मिला टागोर; पुण्यात सिंबायोसिस सांस्कृतिक महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 11:59 IST

सिंंबायोसिस संस्थेतर्फे आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते व अभिनेत्री श्रीमती शर्मिला टागोर यांच्या उपस्थितीत झाले.

ठळक मुद्दे‘शर्मिला टागोर संगीत रजनी’तून उलगडला शर्मिला टागोर यांचा सुवर्णकाळ ६० च्या दशकात अभिनेत्रींनी कसे वागावे, कसे वागू नये, याचे अलिखित नियमच होते : टागोर

पुणे : बदलत्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीत चित्रपटांचा चेहराही बदलत आहे. लोकप्रिय चित्रपटांचे योगदान नाकारता येणार नाही. अवास्तव गोष्टी वास्तवाला धरून सांगण्याची ताकद लोकप्रिय व्यावसायिक चित्रपटांमध्ये आहे. तज्ज्ञ चित्रपटांबद्दल सखोल लेखन करत आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. पूर्वीच्या काळी कलाकारांना ठराविक प्रतिमेमध्ये अडकवले जायचे. आता कलाकारांची चौफेर मुशाफिरी आणि चित्रपटांचे आशयघन विषयांतून चित्रसृष्टी बहरत आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीच्या वाटचालीला उजाळा दिला. सिंंबायोसिस संस्थेतर्फे आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते व अभिनेत्री श्रीमती शर्मिला टागोर यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी समारंभानंतर ‘शर्मिला टागोर संगीत रजनी’या कार्यक्रमातून शर्मिला टागोर यांचा सुवर्णकाळ संवाद, गाणी आणि चित्रपटातील प्रसंगांतून उलगडला. प्रा. अनुपम सिद्धार्थ यांनी मुलाखतीतून त्यांचा संपूर्ण जीवनपट मांडला. मुलाखतीदरम्यान कलाकारांनी टागोर यांची कोरा कागज था ये मन मेरा, ये देख के दिल झुमा, गुनगुना रहे है, दिल ढुँढता है फिर वही, अब के सजन सावन में, चलो सजना जहा तक घटा चले, हम तुम जुदा ना होंगे अशी गाजलेली गाणी सादर करत वातावरणात रंग भरले. त्यांच्या निवडक चित्रपटांतील प्रसंगही मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आले. सत्यजित रे यांच्या सिनेमात तेराव्या वर्षी साकारलेली भूमिका, बंगाली ते हिंदी चित्रसृष्टीचा प्रवास, दिग्गज अभिनेत्यांबरोबर दिलेले हिट चित्रपट अशा विविध आठवणींना यावेळी उजाळा मिळाला.

शर्मिला टागोर म्हणाल्या, ‘माझी आई रवींद्रनाथ टागोर यांच्याबरोबर शिकली. त्यांचे फोटो पाहताना खूप मजा येते. टागोर कुटुंबात जन्माला आले हे माझे भाग्य आहे. शांतिनिकेतनमध्ये शिकण्याची माझी इच्छा होती. तेरा वर्षांची असताना सत्यजित रे यांनी मला चित्रपटामध्ये लहान नववधूची भूमिका मला आॅफर केली. त्या काळात चांगल्या घरातील मुलींनी चित्रपटात काम करणे फारसे मान्य नव्हते. मात्र माझी बहीण टिंकूने एका चित्रपटात काम केले होते. त्यामुळे आई-वडिलांनी मलाही परवानगी दिली. मात्र, शाळेच्या मुख्याध्यापिकांनी नकार दिला, त्यामुळे मला शाळा बदलावी लागली. बंगाली माध्यमातून मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला. सुरुवातीला इंग्रजी बोलताना खूप अडचण यायची. मात्र, माझ्या शिक्षिकांनी मला सांभाळून घेतले.’‘सत्यजित रे यांची कामाची पद्धत खूप छान आणि वेगळी होती. पटकथा वाचा, पण पाठ करू नका, असे ते नेहमी सांगायचे. त्यांनी संवादांमध्ये बोलीभाषा आणली. पूर्वीच्या तुलनेत चित्रपट अधिक सुटसुटीत केले. त्यामुळे वेगळ्या अर्थाने ते चित्रपटांचे जनक आहेत. कामाच्या पद्धतीमुळे सांस्कृतिक, भाषिक मर्यादा ओलांडून त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी आपलेसे केले. चित्रसृष्टीतील परिवर्तनाची सुरुवात रे यांनी केली,’ असेही त्या म्हणाल्या. राजेश खन्ना, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, संजीवकुमार अशा कलाकारांसह काम करण्याचा अनुभव, त्यांची स्वभाववैैशिष्ट्ये असे विविध पैैलू त्यांनी गप्पांमधून उलगडले. ‘६० च्या दशकात अभिनेत्रींनी कसे वागावे, कसे वागू नये, याचे जणू अलिखित नियमच होते. अशा काळात मी ‘अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरिस’ या चित्रपटात बिकिनी घालून पडद्यावर आले. हा बदल सर्वांसाठी धक्कादायक होता,’’असे टागोर म्हणाल्या. 

‘कश्मीर की कली’ या चित्रपटातील ‘ये देख के दिल झुमा’ हे माझे पहिलेच गाणे होते. त्या वेळी मला खूप टेन्शन आले होते. मात्र, गाणे चित्रीत झाल्यानंतर आशा भोसले यांनी माझ्या कामाचे कौैतुक केले आणि मला खूप छान वाटले. काम करताना पैैसा महत्त्वाचा असतोच; मात्र त्यापेक्षाही आपले वैैविध्य, सामाजिक बांधिलकी महत्त्वाची असते. सध्या मी अ‍ॅसिड सर्व्हायवर्सच्या पुनर्वसनासाठी काम करत आहे. अभिनेत्री असल्यामुळे चेहरा किती महत्त्वाचा असतो, हे मला माहीत आहे. त्यांना झालेल्या शारीरिक, मानसिक जखमा, वास्तवाला सामोरे जाण्याची खिलाडूवृत्ती, आत्मविश्वास थक्क करणारा आहे, अशा भावना शर्मिला टागोर यांनी व्यक्त केल्या. 

टॅग्स :symbiosisसिंबायोसिसSharmila Tagoreशर्मिला टागोरRamdas Athawaleरामदास आठवले