शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

माेदींच्या सभेसाठी पुण्यातील वाहतुकीत बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 14:39 IST

माेदींच्या सभेसाठी शहरातील वाहतुकीत काही बदल करण्यात येणार आहे. तसेच काही रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत.

पुणे : पुण्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र माेदी आज स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सभा घेत आहेत. संध्याकाळी 4.30 वाजता सभेला सुरुवात हाेणार आहे. माेदींच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून सभेच्या आधी शहरातील काही रस्ते बंद असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. 

असा असेल बदल...- वाहनचालकांनी डेक्कन येथील खंडोजीबाबा चौकातून संभाजी पुलाकडे न जाता उजवीकडे वळून कर्वे रस्त्यावरून पुढे जावे.

- दांडेकर पुलाकडून टिळक चौकाकडे (अलका टॉकीज) जाणारी वाहतूक बंद करणार आहे. वाहनचालकांनी सावरकर चौक, मित्रमंडळ चौकामार्गे जावे.

- स्वारगेट, सारसबागेकडून टिळक रस्त्याकडे जाणारी जाणारी वाहतूक पूरम चौकातून बंद केली आहे. वाहनचालकांनी बाजीराव रस्त्यावरून पुढे जावे.

- शाहू पूल- दत्तवाडी- जनता वसाहत- पर्वती पायथ्याकडून येणाऱ्या वाहनांनी डावीकडे वळून नाथ पै चौक, एस. पी. कॉलेजकडे न जाता उजवीकडे वळून कल्पना हॉटेल, सणस पुतळामार्गे पुढे जावे.

- सणस पुतळा, कल्पना हॉटेलकडून येणाऱ्या वाहनांना ना. सी. फडके चौकातून सरळ नाथ पै चौकाकडे जाता येणार नाही. तसेच त्यांना डावीकडे वळून एस. पी. कॉलेज चौकाकडे जाता येणार नाही. या वाहनांना केवळ शाहू पुलाकडे किंवा सिंहगड रस्त्याने पुढे जाता येईल.

टिळक व शास्त्री रस्ता "नो पार्किंग'शास्त्री रस्ता, टिळक रस्त्यावरील पार्किंग दुपारी 12 ते रात्री 12 या वेळेसाठी रद्द केली आहे. त्यामुळे नागरिकांनी गुरुवारी संबंधित रस्त्यावर वाहने लावू नयेत. दुपारी बारापासून या बदलाची अंमलबजावणी केली जाईल. पोलिसांकडून वेळ व गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीत बदल केले जातील.

इथे करा पार्किंगसभेसाठी येणाऱ्यांसाठी संयोजकांनी दहा ठिकाणी पार्किंग केली आहे. त्यामध्ये गणेश कला क्रीडा, न्यू इंग्लिश स्कूल, महाराष्ट्र मंडळ, रमणबाग, न. रा. हायस्कूल यासह अन्य ठिकाणी पार्किंग करता येईल. नागरिकांनी सभास्थळी येताना खासगी वाहने टाळून सार्वजनिक वाहनांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनिमित्त गुरुवारी शहरातील वाहतुकीत बदल केला आहे. मात्र बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता हे सर्व रस्ते सुरळीतपणे सुरू राहतील. शास्त्री व टिळक रस्त्यावर गुरुवारी वाहने पार्किंग करता येणार नाहीत. - पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPuneपुणेElectionनिवडणूक