शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अपार्टमेंट कायद्यात बदल करा : ग्राहक पंचायतीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 19:42 IST

अपार्टमेंट कायद्यात करावा, अपार्टमेंटचे प्रश्न सोडविण्यासाठी यंत्रणा उभारावी अशा सहा विविध मागण्यांचे निवेदन अखिल ग्राहक पंचायतीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.

ठळक मुद्देआगामी हिवाळी अधिवेशनात अपार्टमेंट कायदा दुरुस्ती विधेयक सादर करावे अशी विनंतीअपार्टमेंटचे प्रश्न सोडविण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी

पुणे : केवळ दोन ते ८ सदनिका अथवा गाळे असलेल्या इमारतीची अपार्टमेंट करता येईल असा बदल अपार्टमेंट कायद्यात करावा, अपार्टमेंटचे प्रश्न सोडविण्यासाठी यंत्रणा उभारावी अशा सहा विविध मागण्यांचे निवेदन अखिल ग्राहक पंचायतीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात हे बदल मंजुर व्हावेत अशी विनंतीही करण्यात आली आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने सदाशिव पेठेतील ग्राहक सदन येथे अपार्टमेंट कायदा-१९७० यात बदलाबाबत परिसंवाद आयोजित केला होता. त्यात अ‍ॅड. प्रमोद बेंदरे, अ‍ॅड. लीना कौलगेकर, अ‍ॅड. जयंत कुलकर्णी यात सहभागी झाले होते. या परिसंवादातून पुढे आलेल्या सहा मुद्द्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. लहान जागेवर ४ते ५ गाळे बांधणेसाठी कायद्यात अपार्टमेंटची तरतुद करण्यात आली आहे. मात्र, सदर कायद्याचा गैर वापर करुन आपल्या जवळच्या ग्राहकांचे अपार्टमेंट डीड करुन इतर ग्राहकांना वाऱ्यावर सोडून देतात. त्यामाध्यमातून जमीनीची मालकीही स्वत:कडे ठेवणेचा प्रयत्न करतात. याशिवाय घोषणापत्रात तसेच करारनामे करताना वरील टेरेस, मोकळी जागा इत्यादी ठराविक ग्राहकांना विकण्याचे प्रकार घडले असल्याकडेही या परिसंवादात लक्ष वेधण्यात आले. दोन ते आठ गाळे असतील तर अपार्टमेंट होईल व ८ पेक्षा जास्त गाळे असतील तर अपार्टमेंट नाही होऊ शकणार अशी दुरुस्ती कायद्यात करणे गरजेचे आहे. सोसायटी प्रमाणेच रजिस्ट्रारची तरतुद कायद्यात करावी. त्यानुसार अपार्टमेंटचे प्रश्न सोडविण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या शिवाय देखभाल शुल्क, निवडणुका व इतर अपार्टमेंटच्या अडचणींची सोडवणूक करावी. अपार्टमेंटचे डिक्लरेशन डिड एकतरफी न करता ग्राहकांनाही त्यात सामावून घ्यावे, अपार्टमेंटचे रुल्स व रेग्युलेशन ग्राहकाभिमुख करावे, रेरा कायद्यात असलेली सोसायटी-अपार्टमेंटची तरतूद बदलावी, राज्य सरकारने रेरा कायद्यात केलेला पार्कींग विकण्याचा बदल रद्द करुन केंद्र सरकारच्या रेरा कायद्यातील पार्कींग विकू न देण्याचा बदल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात अपार्टमेंट कायदा दुरुस्ती विधेयक सादर करावे अशी विनंतीही त्यात करण्यात आल्याची माहिती अखिल ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष विजय सागर यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस