शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार? चंद्रकांत पाटील करणार विरोधकांशी चर्चा

By विश्वास मोरे | Updated: January 25, 2023 17:23 IST

पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात विरोधक आणि महाविकास आघाडीतील नेत्यांशी चर्चा केली जाईल...

पिंपरी : पोटनिवडणुकीतील उमेदवार जाहीर करण्यासाठी आजची कोअर कमिटीची बैठक होणार नाही. नियोजनाची बैठक झाली. कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात विरोधक आणि महाविकास आघाडीतील नेत्यांशी चर्चा केली जाईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक जाहीर झाली आहे. यासंदर्भात भाजपाची कोअर कमिटीची बैठक नाशिक फाट्याजवळील हॉटेलमध्ये झाली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेस माजी महापौर आणि प्रभारी मुरलीधर मोहळ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, विधान परिषद सदस्य उमा खापरे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, अश्विनी जगताप, राज्य प्रवक्ते एकनाथ पवार, चंद्रकांता सोनकांबळे, सदाशिव खाडे, सचिन पटवर्धन, अमोल थोरात आदी उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘आजची कोअर कमिटीची बैठक ही उमेदवारी जाहीर करण्यासाठी नव्हती तर नियोजनासाठी होती. उमेदवारी केंद्रीय कमिटीकडून जाहीर होईल. पूर्वतयारीची बैठक होती. व्यवस्था बूथ आणि शक्ती प्रमुख संघटनात्मक बांधणीवर चर्चा झाली. विविध २० समिती तयार केल्या आहेत. तसेच संघटन सरचिटणीसपदी अमोल थोरात यांची तर इतर नियोजन समिती प्रमुखपदी शत्रुघ्न काटे, माजी पक्षनेते  नामदेव ढाके आणि राजकीय पक्षांशी संवाद साधण्याची जबाबदारी आमदार महेश लांडगे यांच्याकडे दिली आहे.’’  इच्छा असणे गुन्हा नाहीपोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर इच्छुकांची संख्या वाढली आहे, या प्रश्नावर पाटील म्हणाले, ‘‘इच्छा असणे गुन्हा नाही. निवडणूक जाहीर झाल्याने सर्वच पक्षात इच्छूक असतात. मात्र, भाजपात उमेदवारीचा निर्णय पक्षसंघटना पातळीवरून, श्रेष्ठींकडून घेण्यात येईल. तसेच राजकारण हे मिनिटाला बदलत असते. दोन्ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधीपक्षातील सर्वांना पत्रे दिली जातील.’’

उमेदवार जगताप कुटुंबातीलचकोअर समितीच्या बैठकीनंतर उमेदवार कोण? हे जाहीर होईल, याबाबत उत्सुकता होती. मात्र, नियोजनाची बैठक असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. प्रवक्ते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘चिंचवडचा  उमेदवार हा जगताप कुटुंबातीलच असेल. कोण असेल. हे पक्षश्रेष्ठी ठरवतील.’’

शंकर जगताप म्हणाले, ‘‘निवडणूकीस कसे सामोरे जायचे याबाबत बैठकीत चर्चा झाली. जगताप कुटुंब पक्षनिष्ठ आहे. अजून आम्ही दुखातून सावरलो नाही. उमेदवारीबाबत घरात चर्चा नाही. पक्ष निर्णय घेईल. तो मान्य असेल.’’

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलchinchwad-acचिंचवडkasba-peth-acकसबा पेठvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकMukta Tilakमुक्ता टिळकLakshman Jagtapलक्ष्मण जगताप