शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा हातभट्टीवर चाकण पोलिसांचा छापा, रसायनासह गावठी दारू व साहित्य उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 12:59 IST

गोनवडी (ता. खेड) गावांच्या हद्दीत बेकायदा हातभट्टीवर चाकण पोलिसांनी छापा टाकून, हात भट्टीची दारू तयार करण्यासाठी या ठिकाणी वापरत असलेले रसायन, गावठी दारू व इतर साहित्य उद्ध्वस्त करून काही साहित्य जप्त करण्यात आले.

ठळक मुद्देपोलिसांनी जागेवरच फोडले मानवी जीवितास घातक ठरेल असे दारू बनविण्याचे साहित्य १ हजार रुपये किमतीचे लोखंडी बॅरल, २०० लिटर कच्चे रसायन पोलिसांनी केले नष्ट

आंबेठाण : गोनवडी (ता. खेड) गावांच्या हद्दीत बेकायदा हातभट्टीवर चाकण पोलिसांनी छापा टाकून, हात भट्टीची दारू तयार करण्यासाठी या ठिकाणी वापरत असलेले रसायन, गावठी दारू व इतर साहित्य उद्ध्वस्त करून काही साहित्य जप्त करण्यात आले.गोनवडी गावच्या हद्दीतील ओढ्याच्या पत्रालगत बेकायदा हातभट्टीची दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती  पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी चाकण पोलिसांनी शुक्रवारी (ता. १२) हा छापा टाकला. काळूराम जीवन राजपूत हा हातभट्टीची दारूचे साहित्य बॅरलमध्ये टाकून, रसायन हलवण्याचे काम करत होता, त्याला पोलिसांची चाहूल लागताच, तो ओढ्याच्या कडेच्या झाडीतून पळून जात असताना, पोलिसांनी त्याला ओळखले व आवाज देऊन थांबण्याचा इशारा दिला. मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झालापोलिसांना या छाप्यात मानवी जीवितास घातक ठरेल असे रसायन टाकून गुंगी येणारी विषारी हातभट्टीची दारू बनविण्याचे साहित्य पोलिसांनी जागेवरच फोडले. १ हजार रुपये किमतीचे लोखंडी बॅरल, २०० लिटर कच्चे रसायन पोलिसांनी नष्ट केले. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणे