शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चाकण बसस्थानक बनले बाजारतळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 02:54 IST

एसटी बस स्थानकात भाजीविक्रेत्यांनी अतिक्रमण केले असून, बसस्थानकाच्या आवारात, प्रवेशद्वाराजवळ व चक्क फलाटाशेजारी भाजीबाजार भरतोय.

चाकण: येथील एसटी बस स्थानकात भाजीविक्रेत्यांनी अतिक्रमण केले असून, बसस्थानकाच्या आवारात, प्रवेशद्वाराजवळ व चक्क फलाटाशेजारी भाजीबाजार भरतोय. त्यामुळे बसस्थानक प्रवाशांसाठी की भाजी बाजारासाठी, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातच खासगी गाड्याही स्थानकात उभ्या राहत असल्याने बसगाड्या उभ्या करण्यासाठीच जागा उरत नाही. यामुळे स्थानकात बस आणणार नसल्याच्या इशारा चालकांनी दिला आहे.चाकण बसस्थानक सर्वांत वर्दळीचे ठिकाण आहे. पुणे-नाशिक मार्गावरील लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा थांबा या ठिकाणी आहे.मात्र, स्थानक परिसर आणि आजूबाजूला खासगी व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. यामुळे चालकांना गाड्या आत नेण्यासाठी मार्ग उरत नाही. स्थानकाच्या परिसरात भाजी विक्रेत्यांनी परवानगी नसतानाही ठाण मांडले आहे. यामुळे बसचालकांना गाडी आत नेताना अनेक दिव्य पार करावे लागते.बांधा-वापरा-हस्तांतरण करा या तत्त्वावर हे बसस्थानक बांधण्यात आले असून, त्यावर कुणाचाही कंट्रोल राहिलेला नाही. मराठा आरक्षण आंदोलनात बस स्थानकाचे कार्यालय काही समाजकंटकांनी जाळल्याने वाहतूक नियंत्रकाला बसायला जागाच नाही.स्थानकाचे कामकाज बंदचया जाळपोळीत कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर, एलईडी टीव्ही, कार्यालयीन फर्निचर जळून खाक झाले असून, मागील तीन आठवड्यांपासून कार्यालय बंद असून, येथील कामकाज बंद आहे. या कार्यालयाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी वाहतूक नियंत्रकांकडून होत आहे, मात्र त्यांचे गाºहाणे ऐकायला कोणी तयार नाही.

टॅग्स :Chakanचाकणhawkersफेरीवाले