शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

साखळीचोरी, घरफोडीत घट, वाहनचोरीच्या गुन्ह्यांत वाढ : पुणे शहराचा वार्षिक गुन्हे आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 12:25 IST

शहरातून दररोज आठ ते नऊ वाहने चोरीस जात असून त्यापैकी केवळ २ ते ३ वाहनेच हस्तगत करण्यात पोलिसांना यश येत आहे़ गेल्या वर्षी पुणे पोलीस आयुक्तालयातून ३ हजार १९६ वाहने चोरीला गेली आहेत़ त्यापैकी ९६३ वाहने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

ठळक मुद्देखून, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, नवविवाहितेचा मृत्यू यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये घटप्रतिबंध आणि तपास करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कामगिरी कौतुकास्पद : शुक्ला

पुणे : शहरातून दररोज आठ ते नऊ वाहने चोरीस जात असून त्यापैकी केवळ २ ते ३ वाहनेच हस्तगत करण्यात पोलिसांना यश येत आहे़ गेल्या वर्षी पुणे पोलीस आयुक्तालयातून ३ हजार १९६ वाहने चोरीला गेली आहेत़ त्यापैकी ९६३ वाहने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे़ वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या वर्षी ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे़ रस्त्यावरील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे़ पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले, की लूटमार, साखळीचोरी, घरफोडी, चोरी या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या वर्षी घट झाली असून एकूण मालमत्तेच्या गुन्ह्यांमध्ये ४ टक्क्यांनी घट झाली आहे़ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ८५ टक्के, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ५४ टक्के, चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ३२ टक्के, वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ३० टक्के आहे़ खून, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, नवविवाहितेचा मृत्यू यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे़ सिंहगड रोडवरील बालिकेचा खून, कोथरूडमधील व्यावसायिकाचे अपहरण, निगडीतून बालकाचे अपहरण या गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले़ संगणक अभियंता रसिला राजू हिचा सुरक्षारक्षकाकडून खून करण्यात आला़ त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासह महिला, तरुणींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती़ त्यानंतर पोलिसांकडून महिलांसाठी बडी कॉप हा उपक्रम सुरू करण्यात आला असून यामध्ये ७१४ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत़ त्यात ८५ हजार ४३१ महिला सहभागी आहेत़ गेल्या वर्षभरात पारपत्र पडताळणीसाठी पोलिसांकडून एम पासपोर्ट हा उपक्रम सुरू करण्यात आला असून १ लाख ८९ हजार ८३६ नागरिकांची पडताळणी करण्यात आली आहे़ शहरात गेल्या वर्षी विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे़ 

फसवणुकीत तब्बल ४४७ कोटी : चोऱ्यांमध्ये ५३ कोटीपुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या वर्षी दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांमध्ये ५२८ कोटी ९० लाख ६३ हजार ५५८ रुपयांची मालमत्ता चोरीस गेली असून हे पाहता शहरात दर मिनिटाला ९ हजार ५७१ रुपयांवर चोरटे डल्ला मारत असल्याचे दिसून येते़ त्यात सर्वाधिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये ४४७ कोटी ६२ लाख ५६ हजार १४९ रुपयांचा समावेश आहे़ त्याखालोखाल विश्वासघाताने मालमत्ता हडप करण्याच्या गुन्ह्यात २८ कोटी २६ लाख ५१ हजार ४१४ रुपये चोरीला जातात़ फसवणुकीच्या गुन्ह्यातील ४ कोटी ५६ लाख ६३ हजार ३११ (केवळ १ टक्के) मालमत्ता हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे़ २०१६ मध्ये फसवणुकीच्या गुन्ह्यात ४७४ कोटी ४५ लाख ८८ हजार ७२१ रुपये चोरीला गेले होते़ त्यापैकी ८ कोटी १० लाख ३९ हजार ४३२ रुपये (२ टक्के) हस्तगत करण्यात आले होते़ दरोडा, घरफोडी व सर्व चोऱ्यांमध्ये गतवर्षी ५३ कोटी १ लाख ५५ हजार ९९५ रुपयांची मालमत्ता चोरीला गेली होती़ त्यापैकी १९ कोटी ३६ लाख  ७२ हजार ५९६ रुपयांची (३७ टक्के) हस्तगत करण्यात यश आले होते़ २०१६ मध्ये मालमत्ता हस्तगत करण्याचे प्रमाण २६ टक्के होते़

गुन्हेगारी टोळ्यांवर केलेली मोका कारवाई, गुन्हेगारांवरील वाढती तडीपारीची कारवाई, गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना आलेले यश व गुन्हेगारांवरील वाढता वचक यामुळे गेल्या वर्षी गंभीर गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाली असून प्रतिबंध आणि तपास करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे़ - रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त

 

२०१७ मध्ये दाखल झालेले गुन्हे
गुन्हेदाखलउघडगतवर्षीच्या तुलनेत वाढ/घट
खुनाचा प्रयत्न१६३  १६२ -२९
सदोष मनुष्यवध१४१४ -१
नवविवाहितेचा मृत्यू४७४७-१७
दरोडा२६  २६  -१
दरोड्याची तयारी२५    २५  
जबरी चोरी३९७  ३३८  -९२
दिवसा घरफोडी२८६  १८४  -७४
रात्री घरफोडी७१८  ३५२    -५४
वाहनचोरी३१६९  ९६३   ६
सर्व चोरी५४६६    १७४८    -५५
एकूण मालमत्तेचे गुन्हे६९१८    २६८१    -२६९
विश्वासघात१०१    ९४  -३२
फसवणूक९६९  ७७०    -२
बलात्कार३४९    ३४६    -२०
विनयभंग६९९  ६९४  ३७
एकूण १ ते ५ गुन्हे१३८८५    ८९६१  -४०४
अमली पदार्थ७८  ७८  १५
खून११०    १०५  -२०

 

टॅग्स :Rashmi Shuklaरश्मी शुक्लाPuneपुणे