शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाचनसंस्कृती रुजविणाऱ्या वाचनालयाची ‘सेंच्युरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 01:46 IST

ग्रामीण भागामध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी ब्रिटिश राजवटीमध्ये दुरदृष्टी ठेवून सुरू करण्यात आलेली वाचनचळवळ शतकानंतरही सुरू आहे.

भोर  - ग्रामीण भागामध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी ब्रिटिश राजवटीमध्ये दुरदृष्टी ठेवून सुरू करण्यात आलेली वाचनचळवळ शतकानंतरही सुरू आहे. भोर तालुक्यामध्ये अद्यापही वाचनालये आणि ग्रंथालयांची संख्या अद्यापही कमी आहे. मात्र, भोरचे हे ‘ज्ञानभूषण’ असलेले श्रीमंत गंगुताईसाहेब पंतसचिव वाचनालय दिमाखात उभे आहे. या ग्रंथालयाचा फायदा विद्यार्थी, नागरिक, अभ्यासक घेत आहेत.शनिवारी (दि.९ जून) वाचनालयाला १०० वर्षे पुर्ण झाली. श्रीमंत बाबासाहेब पंतसचिव यांनी ९ जून १९१८ रोजी सार्वजनिक वाचनालय सुरू केले. त्या काळी दोन हजार रुपयांची पुस्तके, ३00 रुपयांसह कपाट व साहित्य देऊन वाचनालय सुरू करण्यात आले. लोकवर्गणीतून ३00 रुपये जमा करण्यात आले. या वाचनालयात सुरुवातीला फक्त पुस्तकेच होती. नंतर वृत्तपत्रे सुरु करण्यात आली. शहराची लोक संख्या वाढल्यावर वाचकांची संख्याही वाढत गेली. यामुळे वाचनालयाची जागा अपुरी पडू लागली.त्यामुळे बाबासाहेबांनी २५ हजार रुपये आणि स्वत:ची जागा देऊन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी इमारत बांधून दिली. इमारतीचा पाया १९२८ मध्ये त्या वेळचे कमिशनर जी. डब्ल्यू. हॅच यांच्या हस्ते झाला. तर इमारतीचे उद्घाटन ८ मे १९२८ रोजी मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते झाले. त्या वेळी वाचनालयाचे अध्यक्ष म्हणून रा. ब. अंजनगावकर होते. संस्थेच्या सभासदांमधून निवड झालेल्या संचालकांकडून वाचनालय व संस्थेचा कारभार सुरू आहे.\ वाचनालयात सुमारे ३८ हजार पुस्तके आहेत. विविध प्रकारची ग्रंथसंपदा आहे. त्यात कादंबरी, चरित्र, ललित, वाङ्मय, कथासंग्रह, काव्यसंग्रह, विज्ञानविषयक, आध्यात्मिक, इतिहास, रहस्यमय, संदर्भ ग्रंथ, इंग्रजी, संस्कृत पुस्तकांचा समावेश आहे. तर बालवाङ्मय पुस्तकांची संख्या सहा हजारांवर आहे. केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसचे १०० वर्षांपूर्वीच्या विविध विषयांवर एनसाइक्लोपीडिया ब्रिटनिकाच्या ३० दुर्मिळ खंडांचा समावेश आहे. मुक्त वाचनालयात १९ वृत्तपत्रे, १० साप्ताहिके व पाक्षिके, ६० मासिके उपलब्ध करून दिली आहेत. 

टॅग्स :newsबातम्याPuneपुणे