शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कात्रजच्या उड्डाणपुलासाठी केंद्रीय झू अथॉरोटी ने दिली मंजुरी: प्रकाश जावडेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 20:50 IST

कात्रजमधील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी कात्रज चौकात उड्डाणपूल उभारणे आवश्यक आहे..

कात्रज:  कात्रज मधील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी कात्रज चौकात उड्डाणपूल उभारणे आवश्यक आहे. यासाठी केंद्रीय झू ऑथोरिटीकडून राजीव गांधी प्राणी संग्रहालयमध्ये उड्डाण पुलाचा खांब उभारण्यासाठी मंजुरी मिळाली असून त्याचे काम लवकर सुरू होईल.असे मत केंद्रीय पर्यावरण मंत्री जावडेकर यांनी व्यक्त केले.   कात्रजमधील श्रीमंत नानासाहेब पेशवे जलाशयमध्ये आजूबाजूच्या मांगडेवाडी, गुजर-निंबाळकर वाडी,भिलारे वाडी या ग्रामपंचायतमधून निर्माण होणारे सांडपाणी मिसळत असल्याने संपूर्ण उपलब्ध पाणीसाठा दूषित झाला आहे.यासाठी पुणे महानगर पालिकेकडून १० कोटी रुपये मंजूर करून ग्रामपंचायत मधून जलाशयात येणाऱ्या पाण्याला पर्यायी ड्रेनेजलाईन उभारणीचे काम मंजूर करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे भूमीपूजनाचा कार्यक्रम खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते कात्रजमध्ये नुकतेच पार पडला. या प्रसंगी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, महापौर मुक्ता टिळक, आमदार योगेश टिळेकर, सभागृह नेता श्रीनाथ भिमाले,नगरसेविका रंजना टिळेकर, मनीषा कदम, वृषाली कामठे, विरसेन जगताप, राणी भोसले, राजाभाऊ कदम, व्यंकोजी खोपडे, महेश जाधव उपस्थित होते.      खासदार गिरीश बापट यांनी आपल्या मनोगत मध्ये सांगितले की,कात्रज तलावामध्ये मिसळणारे सांडपाणी याचा विषय नगरसेविका मनीषा कदम यांनी खूप वेळेस माझ्यापर्यंत आणला. मी महानगर पालिकेतील सर्व सभासदांना सांगून तो मार्गी लावून दिला,कात्रज मध्ये नवीन पोस्ट ऑफिस,नागरिकांसाठी क्रीडा संकुल,योग साधना केंद्र,महिला उद्योजकता विकास केंद्र अशी विविध विकास कामे मनीषा कदम यांनी उभारणीचे काम चालू केले आहे.एक महिला असून मोठ्या धडाडीने त्या काम करत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे निधी कमी पडू देणार नाही. कार्यक्रमास कात्रजच्या आजूबाजूच्या ग्रामपंचायत मधील नागरिक मोठ्या प्रमाणात आले होते.

टॅग्स :katrajकात्रजPrakash Javadekarप्रकाश जावडेकर