शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘फिल्म हेरिटेज मिशन’च्या कामाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती एनएफएआयमध्ये दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 22:05 IST

'फिल्म हेरिटेज मिशन' हा केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने हाती घेतलेला महत्वपूर्ण प्रकल्प आहे. या हेरिटेज मिशनसाठी सुमारे ५९७ कोटींचा भरभक्कम निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ठळक मुद्दे चित्रपटांच्या बरोबरच चित्रपटाशी निगडित पोस्टर, बुकलेट्स, फोटो, करारपत्र, चित्रपट निर्मिती साहित्य) जतन करण्यात येणारएनएफएआय'च्या 'स्टोरेज व्हॉल्ट'चे प्रत्यक्ष भेट देऊन मूल्यांकन करणे यावर ही समिती भर देणार

पुणे : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे (एनएफएआय) जतन केलेल्या देश-विदेशातील दुर्मिळ चित्रपटांच्या लाखो रिळांची विशेष काळजी घेण्यात न आल्याने या रिळांची दुरावस्था, तसेच ’राष्ट्रीय फिल्म हेरिटेज मिशन’ अंतर्गत पावणेदोन वर्षांपासून रखडलेला डिजिटायझेशन आणि रिस्टोअरेशनचा प्रकल्प, कामाच्या आणि खर्चाच्या बाबतीतली अनियमितता या कारणांमुळे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने नेमलेल्या तज्ञांच्या समितीने बुधवारी एनएफएआयला भेट देऊन ‘पाहणी’ केली.  या समितीच्या अहवालावरच ५९७ कोटी रूपयांचा प्रकल्प असलेल्या ‘फिल्म हेरिटेज मिशन’ चे भवितव्य ठरणार आहे. 'फिल्म हेरिटेज मिशन' हा केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने हाती घेतलेला महत्वपूर्ण प्रकल्प आहे. या हेरिटेज मिशनसाठी सुमारे ५९७ कोटींचा भरभक्कम निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात चित्रपटांच्या बरोबरच चित्रपटाशी निगडित पोस्टर, बुकलेट्स, फोटो, करारपत्र, चित्रपट निर्मिती साहित्य) जतन करण्यात येणार आहे. आजमितीला या मिशनसाठी ३० कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र हेरिटेज मिशन च्या कामातील  अनियमितता आणि देशातील दुर्मिळ रिळांचे योग्यपद्धतीने जतन होत नसल्याची माहिती मिळाल्याने मंत्रालयाने या मिशनचे काम योग्य पद्धतीने होत आहे कि नाही यावर लक्ष्य ठेवण्यासाठी व योग्य त्या सूचना करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी मंत्रालयाने ही समिती नेमली. या समितीमध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक शाजी करुण, पीयूष शाह, डिजिटल सिनेमाच्या क्षेत्रातील तज्ञ केतन मेहता, 'एनएफएआय'चे माजी संचालक के. एस. शशीधरन आणि चित्रपट जतन तज्ञ पोन्नाया या पाच जणांचा समावेश आहे. ही समिती एनएफएआयमध्ये बुधवारी दाखल झाली . पहिल्या दिवशी समितीने एनएफएआयच्या विधी महाविद्यालय रस्ता फेज 1 आणि कोथरूड फेज 2 ला भेट दिली. चित्रपट रिळांच्या दुरूस्तीच्या कामाचा आढावा समितीकडून घेण्यात आला. रिळांचे जतन करण्यासाठी असलेल्या ‘स्टोरेज वॉल्ट्स’ची पाहणी समितीने केली. एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम आणि प्रकल्पाचे कार्यकारी अधिकारी संतोष अजमेरा यांनी ’फिल्म हेरिटेज मिशन’चे काम किती झाले असल्याची माहिती दिली. ही समिती दोन दिवस संस्थेच्या  कारभाराची पाहणी करणार असल्याचे समजते.     'एनएफएआय'तर्फे राबविण्यात येणा-या चित्रपट रिळांच्या दुरुस्तीच्या कामाचा सविस्तर आढावा या समितीकडून घेतला जाणार आहे. आजवर चित्रपट संग्रहालयातून खराब झाल्यामुळे नाहीशा झालेल्या चित्रपटांची यादी बनविणे,नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन प्रकल्प कार्यान्वित ठेवण्यासाठी मार्ग काढणे,'एनएफएआय'मधील चित्रपटांच्या रिळांच्या दुरवस्थेबाबत निरीक्षणे गोळा करून त्यांच्या 'रिस्टोरेशन'च्या उपाययोजना सांगणे, 'एनएफएआय'च्या 'स्टोरेज व्हॉल्ट'चे प्रत्यक्ष भेट देऊन मूल्यांकन करणे यावर ही समिती भर देणार आहे.------------------------------------------------------------’ केंद्रीय समिती समोर  ‘फिल्म हेरिटेज मिशन’ चे आजवर जे काम झाले आहे, त्याचे प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. त्यांना संपूर्ण माहिती देण्यात आली. या समितीच्या अहवालावरच प्रकल्पाचे काम पुढे सुरू ठेवायचे कि नाही हे ठरणार आहे- प्रकाश मगदूम, संचालक एनएफएआय 

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारPrakash Magdumप्रकाश मगदूम