शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

प्राचीन मूलभूत शास्त्राच्या अभ्यासासाठी केंद्र

By admin | Updated: January 6, 2016 00:52 IST

प्राचीन भारतीय मूलभूत शास्त्रे आणि तंत्रज्ञान यांचा उगम व विकास यासंबंधींचा अभ्यास करण्यासाठी डेक्कन कॉलेजमध्ये स्वतंत्र केंद्र स्थापन करावे,

पुणे : प्राचीन भारतीय मूलभूत शास्त्रे आणि तंत्रज्ञान यांचा उगम व विकास यासंबंधींचा अभ्यास करण्यासाठी डेक्कन कॉलेजमध्ये स्वतंत्र केंद्र स्थापन करावे, या संदर्भातील प्रस्ताव डेक्कन कॉलेजतर्फे विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) पाठविण्यात आला आहे, असे डेक्कन कॉलेजचे कुलगुरू प्रा. वसंत शिंदे यांनी सांगितले.संस्कृत ग्रंथांमध्ये ज्ञानाचे भांडार असून, त्याचा समाजासाठी विधायक उपयोग होऊ शकतो, असे नमूद करून शिंदे म्हणाले, की गेल्या काही वर्षांपासून संस्कृत विद्वानांची संख्या कमी होत चालली आहे. मात्र, संस्कृत ग्रंथांच्या आधारे विविध प्रयोग करून समाजाला उपयोगी पडतील अशा वस्तूंवर काम करणारे अनेक अभ्यासक देशभर विखुरलेले आहेत. त्या सर्वांना एकाच छताखाली आणून त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचा उपयोग समाजाला करून देता येऊ शकतो. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने स्वतंत्र केंद्र करण्याबाबत पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. प्राचीन तंत्रज्ञान सर्वांना परवडणारे आणि वापरण्यासाठी सोपे आहे. त्यात पाणी शुद्ध कसे करावे अशा अनेक गोष्टींची माहिती आहे. आजही जंगलात राहणाऱ्यांना समाजोपयोगी तंत्रज्ञान अवगत असून, ते सर्वांना उपलब्ध करून देता येऊ शकते. गेल्या काही वर्षांपासून विदर्भात उत्खनन सुरू असून, त्यात सापडलेल्या लोखंडी वस्तूंचा अभ्यास केला असता लोखंडाचा शोध कोरिया किंवा चीनमध्ये नाही तर भारतात लागला असावा,अशी माहिती समोर येत आहेत. (प्रतिनिधी)