शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीवरील नाराजीची केंद्राकडून दखल, केंद्रीय पथक करणार पाहणी, सल्लागार कंपन्यांच्या कामाचे मूल्यमापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 06:03 IST

स्मार्ट सिटी योजनेवर सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलेल्या टीकेची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. या योजनेतील विविध प्रकल्पांच्या कामावर आता थेट केंद्रीय नगरविकास खात्याचे विशेष पथक लक्ष ठेवून असणार आहे.

पुणे : स्मार्ट सिटी योजनेवर सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलेल्या टीकेची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. या योजनेतील विविध प्रकल्पांच्या कामावर आता थेट केंद्रीय नगरविकास खात्याचे विशेष पथक लक्ष ठेवून असणार आहे. प्रकल्पासाठी भरमसाठ शुल्क अदा करून नियुक्त करण्यात आलेल्या विविध सल्लागार कंपन्यांच्या कामाचेही मूल्यमापन या पथकाकडून करण्यात येईल.साधारण दोन वर्षांपूर्वी गाजावजा करत सुरू करण्यात आलेल्या या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम काही केल्या पुढे सरकायला तयार नाही. त्यावर आतापर्यंत विरोधी पक्षांकडूनच टीका होत होती. मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश बापट यांनीच स्मार्ट सिटी कंपनीला धारेवर धरत असाच विलंब होत राहिला तर खर्च होणारा नागरिकांचा पैसा अधिकाºयांच्या खिशातून वसूल करावा लागेल, अशी तंबीच त्यांनी अधिकाºयांना जाहीरपणे दिली. स्मार्ट सिटी योजनेत ५१ प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, त्यातील मोजकाच अपवाद वगळता अनेक प्रकल्प कागदावरच आहेत. त्यामुळेच विरोधकांनी या योजनेची पुणेकरांची केंद्र सरकारने केलेली फसवणूक, अशी संभावना केली आहे. आता तर सत्ताधारीच योजनेच्या विरोधात बोलू लागल्यावर केंद्र सरकारने पथक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला.योजनेतील विविध प्रकल्पांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सल्लागार कंपन्यांवरही सातत्याने टीका केली जात आहे. त्यामुळे या पथकांकडून कंपन्यांनी केलेल्या कामांचे मूल्यमापनही करण्यात येणार असल्याचे महापालिकेतील काही अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे