शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सॉर बोर्ड हा बागलबुवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:37 IST

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव : प्रवीण तरडे यांची टीका

पुणे : विषयाबद्दल माहिती नाही आणि बोंबलत सुटायचे हे आजच्या माध्यमांचे काम आहे. स्वत:ची मतं लादणारा माणूस सिस्टीममध्ये आणि माध्यमात असायलाच नको. मीडिया चित्रपटाला मोठे करणार नसेल, तर आम्ही चित्रपटनिर्मितीचे धाडस कसे करायचे? अर्धा महाराष्ट्र शिव्या देतो, मग आमच्या चित्रपटात शिव्या असल्या तर काय झाले? ‘सेन्सॉर बोर्ड’ हा बागुलबुवा आहे. मराठी चित्रपट झोपावा म्हणून तो भो-भो करतो, असे टीकास्र चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सेन्सॉर बोर्डावर सोडले.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पिफ फोरममध्ये ‘२०१८ सालातील मराठी चित्रपटांचे यश’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भाऊराव कºहाडे, दिग्पाल लांजेकर, संदीप जाधव, राजेंद्र शिंदे, सौमित्र पोटे, मेघराज राजेभोसले आणि विनोद सातव उपस्थित होते.

सेन्सॉर बोर्ड ही एक सिस्टीम आहे. सिस्टीममध्ये स्वत:चे मत कसे असू शकते? सेन्सॉर बोर्डावरील पदाधिकाऱ्यांची आपल्याला मिळणारी उत्तरे, त्यांचे नियम विचित्र आहे. हे पदाधिकारी स्वत:चे मत लादतात, अशा शब्दांत तरडे यांनी सेन्सॉर बोर्डालाच लक्ष्य केले. निर्मात्यांनी लेखनात ढवळाढवळ करायची नाही. लेखन चार माणसांशी चर्चा करून होत नाही. लेखन हे अधिष्ठान आहे, असेही ते म्हणाले.

..सरस्वतीची साथमराठी चित्रपटाला २०१८ वर्षाचा मोठा आशीर्वाद लाभला आहे. प्रेक्षकांची साथ मराठी चित्रपटाला मिळाली. लक्ष्मीचा नाही तर सरस्वतीचासुद्धा येथे सहवास लाभतो हे मराठी मनाचे वैशिष्ट्य आहे. २०१८ या वर्षी बॉलिवूड तोट्यात असून मराठीने चित्रपटाची अर्थव्यवस्था तारली. चित्रपट बनविणे हा एक भाग आणि मार्केटिंग करणे हा चित्रपटाचा दुसरा भाग असतो. चित्रपट हा कुटुंबातल्या प्रत्येकाला आनंद देणारा असावा. चित्रपट हा कलेचा व्यवसाय आहे. काही गोष्टी कलेलाही आपण देणे लागतो. हे एक प्रकारच विज्ञान आहे.- मंगेश कुलकर्णीप्रेक्षक कसा येईल...चित्रपटाला फक्त पैसा लावणे, हे चित्रपट निर्मात्याचे काम नाही. तर, चित्रपटाच्या कथानकाचे सामर्थ्य काय, या कथानकामुळे प्रेक्षक प्रेक्षागृहामध्ये येईल का? हे बघावे लागते. कथानकातील सामग्रीच्या भरवशावर चित्रपट निर्मात्याला चित्रपटावर पैसा लावावा लागतो. चित्रपटातील अभिनेत्यांची निवड करण्यापासून ते चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत निर्माता तिथे असायला हवा.- संदीप जाधव

टॅग्स :Pravin Tardeप्रवीण तरडे