शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईच्या काळातही सिमेंट रस्त्यांची कामे, निविदा प्रक्रिया पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 03:11 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने पुणे शहरात गंभीर पाणी संकट उभे राहिले आहे.

- सुषमा नेहरकर-शिंदेपुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने पुणे शहरात गंभीर पाणी संकट उभे राहिले आहे. शहरात या गंभीर पाणीटंचाईच्या काळातही सिमेंट रस्त्यांची कामे सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या वतीने चालू अंदाजपत्रकात तब्बल ८० ते १०० कोटी रुपयांची सिमेंट रस्त्यांची कामे प्रस्तावित केली आहे. यासाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या काही दिवसांत शहरामध्ये प्रत्यक्ष कामांना सुरुवातदेखील होईल. सिमेंट रस्त्यांच्या कामे थांबविण्याचा निर्णय घेतल्यास महापालिका प्रशासनासमोर एवढा मोठा निधी खर्च करण्याचा गंभीर प्रश्न उभा राहण्याची शक्यता आहे.महापालिकेच्या वतीने दर वर्षी शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे १५० ते २०० कोटी रुपयांचा खर्च केला जातो. यापैकी काही कामे क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर तर काही महापालिका प्रशासनाकडून करण्यात येतात. यापैकी क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर रस्त्यांच्या एकूण कामांपौकी तब्बल ६० टक्के कामे ही केवळ सिमेंट रस्त्यांची असतात. गल्लीबोळातील बहुतेक सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटमध्ये करण्यात येतात. तर महापालिका प्रशासनाच्या स्तरावरून प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांमध्ये ४० टक्के रस्त्यांची कामे ही सिमेंट काँक्रीटमध्ये केली जातात.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चालू अंदाजपत्रकातील कामे आचरसंहिता लागण्यापूर्वी खर्च टाकण्यासाठी प्रशासनाच्या पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यामुळे रस्त्यांच्या एकूण कामांपैकी सुमारे १०० ते ८० कोटी रुपये सिमेंट रस्त्यांसाठी खर्च करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असलेली निविदा व वर्क वॉडरची प्रक्रिया जवळजळ पूर्ण होत आली आहे. यामुळे येत्या काही दिवसांत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्त्यांची कामे सुरू होतील, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.सिमेंट क्रॉँक्रीटची कामे थांबवा : स्थायीसमोर बंदीचा ठरावशहरामध्ये गंभीर पाणी टंचाई निर्माण झाली असून, सध्या शहरात सुरु असलेली सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची कामे तातडीने थांबवा, अशी लेखी मागणी सजग नागरिक मंचच्या वतीने आयुक्त सौरभ राव यांच्याकडे करण्यात आली आहे.याशिवाय नगरसेवक अश्विनी कदम यांनीदेखील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहरात सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांना बंदी घालण्याच्या मागणीचा ठराव स्थायी समितीला दिला आहे.आगामी निवडणुका व कामे सुरू होण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण झाल्याने सध्या तरी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांना बंद घालणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.कामे सुरू करण्याची सर्व प्रकिया पूर्णशहरामध्ये क्षेत्रीय कार्यालयांसह सुमारे ८० ते १०० कोटी रुपयांच्या सिमेंट रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत. यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ही कामे सुरू होतील. परंतु याबाबत वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल, त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल. मात्र सिमेंट रस्त्यांची कामे थांबविण्याचा निर्णय घेतल्यास यासाठी निश्चित केलेल्या निधीचे काय करायचे याचा निर्णय घ्यावा लागले.- अनिरुद्ध पावसकर, पथविभाग प्रमुखसर्व पक्षांशी चर्चा करून निर्णयशहरात सुरु असलेली व प्रस्तावित सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची कामे थांबविण्याबाबत एका सदस्यांनी स्थायी समितीकडे ठराव दिला आहे. परंतु याबाबत सर्व पक्षांची चर्चा करून सिमेंट रस्त्यांची कामे थांबवायची की काय अंतिम निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे अद्याप तरी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांबाबत काही निर्णय झाला नाही.- योगेश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष 

टॅग्स :Puneपुणे