शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी झाल्याचे 'कडक' सेलिब्रेशन : हॉटेल मालकाची सर्व ग्राहकांना पार्टी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 17:23 IST

मुलगी झाली प्रगती झाली असे म्हटले जाते. पण पुण्यातल्या एका उद्योजकाला त्याचा अगदी खराखुरा अनुभव आला आहे.

पुणे :  मुलगी झाली प्रगती झाली असे म्हटले जाते. पण पुण्यातल्या एका उद्योजकाला त्याचा अगदी खराखुरा अनुभव आला आहे. काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेले कडक चहा या दुकानाचे संचालक अजित केरुरे यांनी मुलगी झाल्याच्या आनंदात येणाऱ्या प्रत्येक विनामूल्य चहा आणि हवे ते पेय तर दिले आहेच शिवाय प्रत्येकाला पेढेही वाटले आहेत. 

   याबाबत अधिक माहिती अशी की, मागील काही दिवसांपूर्वी इंजिनिअरिंग डिग्रीला हार घालणाऱ्या उद्योजकाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.तो फोटो केरुरे यांचाच असून ही डिग्री फक्त लग्न करताना उपयोगी पडली असे त्याखाली लिहिले होते. त्यामुळे पुणेकरांच्या आकर्षणाचा भाग बनलेले हे दुकान आता अजून एका कारणाने चर्चेत आले आहे. त्याचे कारण असे की, आज अजित यांना मुलगी झाली असून त्यांना चहा, कॉफी आणि इतर कोणतेही पेय पिण्यास येणाऱ्या प्रत्येक ग्राहकास विनामूल्य सेवा दिली आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येकाला पेढाही देण्यात येत आहे.

   या विषयी अजित यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'पहिली बेटी धनाची पेटी' या वाक्याची प्रचिती मला आयुष्यात आली आहे. आज माझ्या आणि पत्नीच्या आयुष्यातला सर्वांचे आनंदाचा दिवस आहे. यातून मला प्रसिद्धी मिळवण्याची इच्छा नसून मला माझा आनंद सर्वांसोबत वाटायचा होता.आज चहाला येणाऱ्या ग्राहकांनी बाळाला दिलेले आशीर्वाद माझ्यासाठी अधिक महत्वाचे आहेत असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Puneपुणेfoodअन्न