श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या स्व. कमलाबाई माणिकचंद मुथा कन्या प्रशाला सासवड येथे संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा वाढदिवस ' ज्ञानशिदोरी दिन ' म्हणून साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान यांच्या वतीने इयत्ता नववी, दहावीच्या हजर १०० विद्यार्थिनींना स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील पुस्तके प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोषशेठ जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिक झेंडे पाटील,सासवड नगरपालिकेचे नगरसेवक दिपक टकले, नगरसेविका सीमा भोंगळे, बबुसाहेब माहुरकर, मयूर जगताप , रंगोलीकार सोमनाथ भोंगळे, प्राचार्य अरुण सुळगेकर, मुख्याध्यापिका उषा सुळगेकर यांच्या हस्ते वाचनासाठी वाटप करण्यात आली. या वेळी प्रशालेत शिक्षक इस्माईल सय्यद यांनी पुस्तकांचे प्रदर्शन भरविले होते. . प्रसिद्ध रंगोलीकार सोमनाथ भोंगळे यांनी अभयकुमार साळुंखे यांचे हुबेहूब छायाचित्र रांगोळीतून साकारले.. प्रास्ताविक मुख्याध्यापिका उषा सुळगेकर यांनी केले.सूत्रसंचालन इस्माईल सय्यद तर आभार मीनल जाधव यांनी मानले.
कन्या प्रशाला येथे स्वामी विवेकानंद याचे जीवनावरील पुस्तकाचे वाटप करणेत आले