शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्ही बाधितांबरोबर दिवाळी साजरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 00:22 IST

महिंद्रा व्हेइकल मॅन्युफॅक्चरर्स लि. व यश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्हीसह जीवन जगणारी मुले व पालकांसाठी दीपावलीचा सण साजरा करण्यात आला.

चाकण : महिंद्रा व्हेइकल मॅन्युफॅक्चरर्स लि. व यश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्हीसह जीवन जगणारी मुले व पालकांसाठी दीपावलीचा सण साजरा करण्यात आला. दिवाळी सण हा जीवनातील अंध:कार दूर करून सकारात्मक जीवन जगायला सांगतो, असाच प्रामाणिक हेतू ठेवून महिंद्रा व्हेइकल मॅन्युफॅक्चरर्स लि.ने एचआयव्हीसह जीवन जगणारी मुले व पालकांसाठी दीपावली कार्यक्रमाचे आयोजन आपल्याच अंगणात करून दिवाळीचा आनंद साजरा केला. याद्वारे समाजातील एचआयव्ही बाधितांविषयीचा असणारा भेदभाव, कलंक गैरसमज दूर होऊन सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होईल, अशी भावना व्यक्त केली.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महिंद्रा व्हेइकल मॅन्युफॅक्चरर्स लि. प्लांटचे प्रमुख नचिकेत कोडकनी, जोन डीसा, डॉ. अमोल भांबरे, मार्शल थॉमस, प्रवीण गुंजाळ, यश फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुण्यांच्या व मुलांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. नचिकेत कोडकनी यांनी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन कंपनीचा सकारात्मक दृष्टिकोन सांगितला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुलांना व पालकांना दिवाळीच्या भेटवस्तूसह मिठाई, फराळाचे वाटप करण्यात आले.मनोरंजनाच्या कार्यक्रमात महिंद्रा कंपनीचे व यश फाउंडेशन स्वयंसेवक यांनी मुलांसोबत नृत्य करून दिवाळीचा मनसोक्त आनंद लुटला. कार्यक्रमात एचआयव्ही सहजीवन जगणारी २५० मुले व पालकांनी सहभाग नोंदविला. सीएसआरचे उपव्यवस्थापक प्रवीण गुंजाळ, सनी लोपेझ, आदी कंपनी व यश फाउंडेशन स्वयंसेवक, इतर अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेDiwaliदिवाळी