शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवर कचरा टाकणा-यांवर सीसीटीव्ही वॉच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 16:19 IST

रस्त्यावर थुंकणे, पाळीव प्राण्यांची ‘शी’ फुटपाथवर घाण, कचरा टाकणा-यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देशहरात ४२७ ठिकाणी टाकला जातो रस्त्यावर कचरा सध्या शहरामध्ये स्वच्छ भारत अभियाना अतंर्गत स्वच्छ सर्वेक्षण मोहीम सुरु स्वच्छ शहर व पुण्याला या सर्वेक्षणात थ्री स्टार मिळण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न

पुणे: शहरात स्वच्छ भारत अभियानामुळे विविध पातळीवर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. रस्त्यावर थुंकणे, पाळीव प्राण्यांची ‘शी’ फुटपाथवर घाण, कचरा टाकणा-यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. आता शहराच्या विविध भागात रस्त्यावर कचरा टाकणा-यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये शहरातील अशा प्रकारचे रस्त्यांवर कचरा टाकणारे ४२७ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, येथे सीसीटीव्ही वॉच ठेवण्यात येणार आहे. सध्या शहरामध्ये स्वच्छ भारत अभियाना अतंर्गत स्वच्छ सर्वेक्षण मोहीम सुरु आहे. गेल्या एक महिन्यांपासून शहर स्वच्छ करण्यासाठी व पुण्याला या सर्वेक्षणात थ्री स्टार मिळण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी विविध पातळीवर प्रयत्न करत आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून रस्त्यावर कचरा टाकणा-यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यामध्ये शहरात महापालिकेच्या वतीने घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याची सुविधा उपलब्ध करू दिली आहे. परंतु कचरा गोळा करणा-या सेवकांना दर महा ५० ते ६० रुपये द्यावे लागतात म्हणून अनेक लोक कचरा रस्त्यावर टाकतात. तर शहरात प्रामुख्याने उपनगरांमध्ये शहराच्या हद्दी बाहेरील लोक कामासाठी शहरात येतात हा कचार टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये शिवणे, चंदननगर, खराडी, वारजे, सिंहगड रोड, आंबेगाव, आदी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या शहरात रस्त्यावर कचरा टाकत असलेले ४२७ स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत.  या सर्व ठिकाणी  सकाळी व रात्रीच्या वेळी महापालिकेचे कर्मचारी देखील या भागात गस्त घालणार आहे. रस्त्यावर कचरा टाकणा-यांवर आॅन दि स्पॉट २०० रुपये दंड करण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान