शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतून संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 13:02 IST

गेल्या काही वर्षांत पुणे शहर पोलिसांमार्फत शहरातील बहुतेक सर्व प्रमुख चौक आणि प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

ठळक मुद्देपुणे शहर पोलीस : निधीसाठी महापालिकेकडे लेखी मागणी

पुणे : शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण शहरभर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक आहे. परंतु पुणे शहर पोलिसांकडे यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध नाही. यामुळे महापालिकेच्या वतीने प्रत्येक नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतून २ लाख असे सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा निधी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे. शहर पोलिसांनी महापालिकेला निधीची मागणी करणारे लेखी पत्र दिले आहे. गेल्या काही वर्षांत पुणे शहर पोलिसांमार्फत शहरातील बहुतेक सर्व प्रमुख चौक आणि प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परंतु अद्यापही शहरातील फार मोठा भाग सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेखाली आलेला नाही. यामुळेच सुरक्षितेच्या दृष्टीने संपूर्ण शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज असून, महापालिकेने यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पोलिसांनी केली आहे. पोलिसांच्या या मागणीनुसार महापालिका प्रशासनाने सर्व नगरसेवकांना विनंती केली असून, प्रत्येक नगरसेवकाने आपल्या वॉर्डामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी किमान प्रत्येकी २ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा. ......किती कॅमेरे लागणार, याची माहिती घेण्याचे काम सुरू याबाबत महापालिकेच्या विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल यांनी  सांगितले की, महापालिकेच्या वतीने गणेशोत्सवामध्ये सर्व घाट परिसरामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये कॅमेरे बसविले जातात. परंतु संपूर्ण शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नेटवर्क उभे करण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक नगरसेवकाकडून २ लाख रुपयांचा निधी घेण्यात येणार आहे. यासाठी पोलिसांकडून कोणत्या परिसरामध्ये किती कॅमेरे बसविण्याची गरज आहे, याबाबत माहिती घेण्यात येणार आहे. त्यानंतर सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजन करण्यात येईल, असे कंदुल यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Puneपुणेcctvसीसीटीव्हीPoliceपोलिसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका