शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

काँग्रेस-राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप, कचरा डेपो उभारत असल्याचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 03:03 IST

प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोरगरिबांच्या घरांसाठी आरक्षित असणाºया ज्योतिबा मंदिरानजीकच्या जागेवर नगर परिषद कचरा डेपो उभारत असल्याच्या कारणावरून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली.

इंदापूर : प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोरगरिबांच्या घरांसाठी आरक्षित असणाºया ज्योतिबा मंदिरानजीकच्या जागेवर नगर परिषद कचरा डेपो उभारत असल्याच्या कारणावरून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली.सभागृहात मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांना घेराव घालून तब्बल ३ तास सत्ताधारी गट व प्रशासकीय अधिकाºयांना धारेवर धरले. सभागृहाबाहेर सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.सभा संपल्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभागृहात मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांना घेराव घातला. स्वत:लाही सभागृहात कोंडून घेतले. नगरसेवकांनी नगर परिषदेच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचला.विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, गटनेते गजानन गवळी, श्रीधर बाब्रस, राजश्री मखरे, हेमलता माळुंजकर, उषा स्वामी, मधुरा ढवळे, अमर गाडे आदींनी प्रश्नांची सरबत्ती करीत सभागृह दणाणून सोडले. मुख्याधिकारी झंवर त्यांच्या प्रश्नांना अपेक्षित उत्तर देत नाहीत, आपले म्हणणे गांभीर्याने घेत नाहीत, असे वाटल्यानंतर नगरसेवकांनी थेट आमदार दत्तात्रय भरणे यांना फोनवरून प्रकरणाची माहिती दिली.मुख्याधिकाºयांनी लेखी उत्तर द्यावे; मगच आम्ही सभागृहातून बाहेर जाऊ, असा पवित्रा घेतला. या वेळी रात्रीचे ८ वाजले होते. दरम्यान, ‘मला कोंडून ठेवले म्हणून मी जिल्हाधिकाºयांना कळवतो,’ असा पवित्रा मुख्याधिकाºयांनी घेतला. त्याच वेळी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अडथळा आणला; त्यामुळे कायदेशीर कारवाईची मागणी करा, अशी चिथावणी काँग्रेसचे कार्यकर्ते देत होते. या स्थितीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले. आमदार भरणे यांची घनकचरा प्रकरणी सहमती असल्याबाबत बोलणी झाल्याचे या वेळी सांगण्यात आले.त्याचेही सभागृहात व बाहेर पडसाद उमटले. कार्यालयीन व्यवस्थापक गजानन पुंडे यांनी मध्यस्थी करून लेखी देण्यासाठी मुख्याधिकाºयांची व नगरसेवकांची समजूत घातली. रात्री साडेनऊ वाजता नगरसेवकांना लेखी पत्र मिळाले. तोपर्यंत मुख्याधिकाºयांच्या कार्यालयासमोर नगरसेवकांनी ठिय्या मांडला होता. सत्ताधारी नगरसेवक व कार्यकर्ते नगर परिषदेमध्ये बसून होते.नगर परिषदेने उजनी धरण व्यवस्थापन विभागाकडील गट नं. ३४ / १ / अ / २ मधील १ हे ८५ आर क्षेत्र घनकचरा व्यवस्थापनाकरिता शासनाकडे मागितले आहे. त्याचे १७ लाख ४४ हजार ५५० रुपये दिले आहेत.मात्र, जागा हस्तांतरास विलंब होत आहे; त्यामुळे या जागेवर घनकचरा प्रक्रिया करण्यासाठी पत्रा शेड व जोत्याचे बांधकाम करण्यात आले आहे. त्याला मान्यता घेण्यासाठी प्रशासकीय बाब म्हणून पत्रव्यवहार करणे आवश्यक होते.याबाबत निर्णय घेण्यास सभागृह सक्षम आहे, असे मुख्याधिकाºयांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.कचरा डेपोसंदर्भात वेळोवेळी ठरावमागील १५ ते २० वर्षांपासून ज्योतिबा मंदिर परिसराच्या जागेत कचरा डेपो आहे. घनकचरा प्रक्रियेसंदर्भात सभागृहात वेळोवेळी ठराव केला गेला आहे; मात्र कचरा डेपोचा नागरिकांना त्रास होतो.मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. वारंवार कचरा डेपोला आग लागते. प्रदूषण वाढते, हे धोकादायक आहे. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. संत तुकोबामहाराज पालखी विश्वस्तांनीदेखील याबाबत नाराजी व्यक्त केली होती. नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेमध्ये इंदापूर शहराचा समावेश आहे.ज्योतिबा मंदिर परिसराच्या सिटी सर्व्हे नं. १९७ (जुना गट नं. ८१०) जागेत नजीक दलित वस्त्या, आठभाईमळा, शिवाजीनगर, आश्रमशाळा, हायस्कूल, आयटीआय व लोकवस्ती आहे. म्हणूनच जाणीवपूर्वक कचरा डेपो केला जात आहे, असा आरोप सभागृहात नगरसेवक श्रीधर बाब्रस, राजश्री मखरे, गजानन गवळी यांनी केला.

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस