शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर पकडा; कामे मार्गी लागतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 02:00 IST

लाचखोराला पकडून दिल्यावर तक्रारदाराचे काम लवकर होतेच, परंतु इतरांचीही कामे मार्गी लागतात. एका अर्थाने समाजसेवाच घडते, असे आजपर्यंतच्या उदाहरणांवरून पुढे आले आहे.

- विवेक भुसे पुणे : लाच मागितल्यावर प्रचंड चीड येते; तक्रार करण्याचीही इच्छा होते. पण आपले काम आणखी अडेल, अशा भीतीने नागरिक तक्रार करण्यास घाबरतात. पण घाबरू नका. लाचखोराला पकडून दिल्यावर तक्रारदाराचे काम लवकर होतेच, परंतु इतरांचीही कामे मार्गी लागतात. एका अर्थाने समाजसेवाच घडते, असे आजपर्यंतच्या उदाहरणांवरून पुढे आले आहे.‘लोकमत’ने काही तक्रारदारांशी संपर्क साधला असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा चांगला अनुभव आला असून तेथील अधिकारी सापळा कारवाई झाल्यानंतरही काम पूर्ण होईपर्यंत संपर्कात असल्याचे सांगितले़ याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुहास नाडगौडा यांनी सांगितले की, सापळा लावून पकडलेल्या कर्मचारी अथवा अधिकाऱ्याच्या वरिष्ठाला दुसºया दिवशी आमच्या कार्यालयात बोलावले जाते. त्यांचा जबाब घेतला जातो़ त्यात कारवाई झालेल्या अधिकारी, कर्मचाºयाकडे कार्यालयात कोणती जबाबदारी आहे़ त्यांच्या कामाचे स्वरूप काय होते.तक्रारदाराचे काम का अडले होते, अशी माहिती घेतली जाते़ त्याशिवाय या गुन्ह्यात या अधिकाºयाचा काही सहभाग आहे का, याचीही चौकशी केली जाते़ संबंधित तक्रारदार यांचे कायदेशीर काम कोठेही अडणार नाही़ यासाठी त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवला जातो़ त्यामुळे कोणत्याही तक्रारदाराचे कायदेशीर काम कधी अडत नाही.५ महिने अडलेले काम १५ दिवसांत झालेपुणे-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणात माझी जमीन जात होती़ त्याचा ८४ लाख रुपयांचा मोबदला मला मिळणार होता़ तो धनादेश भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकाºयांकडे तयार होता़ परंतु, ४ ते ५ महिने तो मिळत नव्हता़ उपजिल्हाधिकाºयांनी त्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागितली होती़ मी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली़ त्यानंतर दीड लाख रुपये लाच देण्याची तडजोड झाली़ त्याप्रमाणे सापळा रचून त्या उपजिल्हाधिकाºयांना पकडण्यात आले़ त्यानंतर त्यांच्या जागी नवीन अधिकाºयांची नेमणूक होण्यास काही वेळ गेला़ नवीन अधिकारी येताच त्यांनी तातडीने धनादेश दिला़ जे काम ५ महिने रखडलेले होते ते तक्रार दिल्यानंतर १५ दिवसांत झाले़साहित्य परत मिळालेलोणावळ्यातील शेतजमीन बेकायदेशीर प्रवेश करून बांधकाम केल्याप्रकरणी वन विभागाच्या वनपाल व इतरांनी सिंहगड इन्स्टिट्यूटच्या ठेकेदारचा जेसीबी व इतर साहित्य जप्त करण्यात आले होती़ ते सोडविण्यासाठी तेथील वनपाल याने १५ लाख रुपये मागितले होते़ त्यानंतर ११ लाख रुपयांवर तडजोड झाली़ सापळा रचून वनपालाला पकडण्यात आले़ या जागे उच्च न्यायालयात दावा चालू आहे़ आम्ही अर्ज केल्यानंतर आता काही अटी व शर्तीवर जप्त केलेले साहित्य वन विभागाने परत केले असल्याचे तक्रारदाराने सांगितले.अशीही समाजसेवा संपूर्ण तालुक्यातील सातबाराच्या नोंदीमुळशी तालुक्यातील एका तलाठ्याने सात बारा वर नोंद करण्यासाठी लाच मागितली होती़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्या तलाठ्याला पकडले़ त्यानंतर दुसºया दिवशी मुळशी तालुक्याचे तहसीदारांना जबाबासाठी बोलविण्यात आले़ तक्रारदारांचे काम का अडले होते़ सात बारावर नोंद करण्यात काय अडचणी आहेत याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केली़ त्यानंतर संपूर्ण तालुक्यात सातबारावर नोंद करण्यासाठी अर्ज आले़ त्याचा आढावा घेतला व एक महिन्याच्या आत या सर्व अर्जांच्या नोंदी होऊन ते निकाली निघतील, याकडे स्वत: जातीने लक्ष दिले़

टॅग्स :Puneपुणे