शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जात, धर्म आणि कला याअगोदर आपण सर्व माणूस आहोत : नागराज मंजुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 18:56 IST

माझ्या आयुष्यात काहीच ठरवून घडत नाही. मी पिस्तुल्या, फँड्री व सैराट हे चित्रपट केले. पण खरंच फक्त मला कथा सांगायच्या होत्या आणि त्या मी जमेल तशा सांगत गेलो.

ठळक मुद्देसध्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत सिनेमाचे काम सुरु

पुणे : मला कलाकार म्हणून जगण्याऐवजी माणूस म्हणून जगण्यात अधिक रस आहे. जात, धर्म. आणि कला याहीपलीकडे सर्वात अगोदर आपण माणूस आहोत. जमेल तसे कोणतीही कला घेऊन आपण आपले काम करावे. लोकांनी काय घ्यायचे हे त्यांनी ठरवावे,असे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सांगितले. विश्रांतवाडी, पुणे येथे झिवा स्टुडियो स्पेस याचे मंजुळे यांच्या हस्ते उदघाटन झाले. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य रोहितदादा पवार, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण गायकवाड व पुणे मनपाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक हे उपस्थित होते. प्रज्ञेश मोळक यांनी नागराज मंजुळे यांची प्रकट मुलाखत घेतली.  मंजुळे म्हणाले , माझ्या आयुष्यात काहीच ठरवून घडत नाही. मी पिस्तुल्या, फँड्री व सैराट हे चित्रपट केले. पण खरंच फक्त मला कथा सांगायच्या होत्या आणि त्या मी जमेल तशा सांगत गेलो. लोकांना त्या आवडल्या की नाही माहीत नाही. मला कथा सांगायला आवडतात व त्या मी सिनेमाच्या माध्यमातून दाखवतो. सध्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत सिनेमा करत असून, अजून दोन ते तीन सिनेमांचा विचार सुरु आहे. मंजुळे म्हणाले, सध्या तरुण नव्या उमेदीने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात हे बघून आनंद होतो. झिवा स्टुडियो स्पेस हे असेच एक आहे जिथे वेगळं काहीतरी नक्कीच निर्माण होत राहील. नागराज मंजुळे यांनी त्यांच्या काही कविताही सादर केल्या आणि लोकांची मने जिंकली. राजकारणापलीकडे जाऊन कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्याचा माझा नक्की प्रयत्न करणार आहे. तरुणाईमध्ये फार कल्पकता आहे. अगदी खेड्यापाड्यातील तरुणसुद्धा यात मागे नाहीत. पारंपरिकता जपून आपण  आधुनिक गोष्टी आत्मसात करून त्यांची सांगड घातली पाहिजे, असेही मंजुळे यांनी सांगितले. स्वप्नील चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :PuneपुणेNagraj Manjuleनागराज मंजुळेpravin gaikwadप्रवीण गायकवाड