शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जात ही बोगस गोष्ट : डॉ. कुमार सप्तर्षी; ‘मातंग चळवळीचा इतिहास’वर परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 13:23 IST

मातंग समाजामधील जुन्या चालीरीती धरून चालत असल्यामुळे समाज मागे जात असल्याची खंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केली. ‘मातंग चळवळीचा इतिहास’ महाराष्ट्र शासनाच्या दलित साहित्यातील पुरस्कार प्राप्त ग्रंथ या विषयावर परिसवांदावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देजुन्या चालीरीती धरून चालत असल्यामुळे मातंग समाज मागे :डॉ. कुमार सप्तर्षी मातंग समाजाचा खरा इतिहास लिहावा लागणार : सचिन बगाडे

पुणे : आज जातीय अस्मिता या विचारधारेच्या अस्मितेपेक्षा तीव्र होताना दिसत आहेत. जात ही माणसाला वक्र दृष्टीकडे नेते , त्यामुळे जात ही बोगस गोष्ट आहे. मातंग समाजामधील जुन्या चालीरीती धरून चालत असल्यामुळे समाज मागे जात असल्याची खंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केली.क्रांतिगुरू लहुजी महासंघाच्या वतीने पुणे शहरच्या वतीने ‘मातंग चळवळीचा इतिहास’ महाराष्ट्र शासनाच्या दलित साहित्यातील पुरस्कार प्राप्त ग्रंथ या विषयावर परिसवांदावेळी ते बोलत होते. टिळक रोडवरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात झालेल्या या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी  उद्घाटन युवक क्रांती दलाचे समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षीं, कार्यक्रमाचे अध्यक्ष क्रांतिगुरु लहुजी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश वैराळ, औरंगाबाद विद्यापीठाचे प्रा.डॉ. सुरेश चौथाईवाले, दलित स्वयंसेवक संघाचे प्रमुख दादासाहेब सोनवणे, दलित युवक आंदोलनाचे अध्यक्ष सचिन बगाडे, लेखक व दिग्दर्शक  सुरेश पाटोळे, अशोक लोखंडे, रवी आरडे, विकास सातारकर, भास्कर नेटके आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक व उपस्थितांचे स्वागत एकनाथ चांदणे यांनी केले. सूत्रसंचालन आतिष कापसे यांनी, तर आभार शैलेश आवळे यांनी मानले. 

आंदोलनात किंवा राजकारणात जातीची गरज नको तेवढी वाढलेली आहे.  कोणी जन्माअगोदर जात ठरवून जन्म घेत नाही . त्यामुळे माणसाला जोडणारा माणुसकी धर्म महत्त्वाचा आहे. आपण सर्वांनी घराबाहेर भारतीय म्हणून राहिले पाहिजे. - डॉ. कुमार सप्तर्षी

दलित समाजामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणारा मातंग समाज, मातंग समाजाला ज्ञानाची परंपरा आहे. मातंग समाजाला खोटा इतिहास सांगून समाजाची फसवणूक आजपर्यंत करण्यात आली आहे, त्यासाठी मातंग समाजाचा खरा इतिहास लिहावा लागणार आहे. - सचिन बगाडे

टॅग्स :Kumar Saptarshiकुमार सप्तर्षीMaharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषदPuneपुणे