शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

रस्तेबांधणीतील दोषांमुळे नागरिकांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 03:13 IST

ठिकठिकाणी खड्डे, चढ-उताराचे रस्ते; वाहने घसरून पडल्याने जाताहेत जीव, उपाययोजना करण्याची मागणी

चंदननगर : मुंढवा येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर पडलेला खड्डा व्यवस्थित बुजवा अशी पोलिसांची सूचना देऊनही महापालिकेने दुर्लक्ष केले. त्यामुळे एका ज्येष्ठ नागरिकाचा जीव गेला. परंतु, चंदननगर परिसरातील अनेक रस्त्यांवर चुकीची रस्तेबांधणीझालेली आहे. कुठे खड्डे आहेत, तर कुठे चढ-उतार आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविणे कठीण जाते. परिणामी अपघातहोत असल्याने नागरिकांचे बळी जात आहेत.

रस्त्याने जाताना एखादा खड्डा अथवा वर आलेले चेंबर दिसते. काही ठिकाणी रस्त्याची रचना वर-खाली झालेली असते मात्र या छोट्या गोष्टी अपघातास निमंत्रण देणाऱ्या ठरतात. कुटुंबातील व्यक्ती जखमी असली अथवा उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यास सर्वांची पळापळ होते. किरकोळ उपचाराचा खर्च परवडत नाही. उपचारास किती खर्च येईल याबाबत शाश्वती नसते. कधीकधी तर वारेमाप पैसा खर्च केला जातो. रस्ते बांधणी करताना ते काम उत्कृष्ट आणि टिकाऊ होणे अपेक्षित असते मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते. कामाचा दर्जा गांभीर्याने पाहिला जात नाही. एकदा काम झाले की पुन्हा त्याकडे लक्ष दिले जात नाही. एखादी घटना घडल्यानंतर तेवढ्यापुरतीच डागडुजी करण्यात येते. परंंतु, त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण होते. काही वेळा वृद्ध व्यक्ती दुचाकीवर असते, दरम्यान खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात होऊन मोठे नुकसान होते. अशा वेळी तातडीने सुधारणा करणे गरजेचे असताना तत्परता दाखवली जात नाही. एखादा अपघात घडल्यानंतर त्या ठिकाणाबाबत चर्चा होते. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात, दुचाकी घसरून मृत्यू , पडल्याने डोक्याला मार, अंदाज न आल्याने अपघात अशा घटना नेहमीच घडत आहेत. तरी देखील प्रशासन जागे होताना दिसून येत नाही.जलवाहिनीची झाकणे धोकादायककल्याणीनगर : नगर रोड, कल्याणीनगर आणि कोरेगाव पार्क मधील अनेक ड्रेनेजची झाकणे े(मॅनहोल्स) रस्त्याशी समलत नाहीत. त्यामुळे दुचाकीस्वारांचा गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. या नादुरुस्त मॅनहोल्सची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.तीन वर्षांपूर्वी धनकवडीतील तीन हत्ती चौकामध्ये दोन दुचाकीस्वारांचा नादुरुस्त मॅनहोल्स मुळे झालेल्या अपघातामध्ये दुर्दैवी अंत झाला होता. या अपघाताचे पडसाद मुख्यसभेत उमटले होते. मुख्य सभेत नगरसेवकांनी प्रशासनावर टीका केली होती. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अपघात होतो असा आरोप केला होता. त्या वेळी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी तातडीने धोकादायक मॅनहोल्सचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पथ विभागाने केलेल्या सर्वेक्षणात शहराच्या विविध रस्त्यांवर मॅनहोल्स धोकादायक स्थितीत असल्याची माहिती समोर आली होती. पालिकेच्या पथ विभागातर्फे त्याची तातडीने दुरुस्ती हाती घेण्यात आली होती. शहरातील अतंर्गत रस्त्यावरील मेनहोल्सचे सर्वेक्षण क्षेत्रीय कार्यालय- निहाय केले जाणार होते. मात्र, कालांतराने मेनहोल्सच्या दुरुस्तीचे काम थंडावले गेले. पालिका प्रशासनाने मेनहोल्सच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. नगर रोडवर रामवाडी भुयारी मार्ग ते खराडी बायपास रस्त्यादरम्यान अनेक मेनहोल्सचे झाकणे रस्त्याच्या खाली गेली आहेत. त्यामुळे नगर रस्त्यावर खड्डे तयार झाले आहेत.याप्रमाणे कल्याणीनगरमधील अंतर्गत रस्त्यावर मेनहोल्समुळे अनेक खड्डे तयार झाले आहेत. रात्रीच्या वेळी हे खड्डे दिसत नाहीत. यामुळे किरकोळ अपघात होत आहे. खड्ड्यातून गाडी गेल्यामुळे पाठीला दुखापत होत आहे. गाडीचे नुकसान होत आहे. या नादुरुस्त मेनहॉलमुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्व मेनहोल्स त्वरित दुरूस्त करण्याची मागणी नागरिक करूलागले आहे.खराडी परिसर धोकादायकवडगावशेरी, खराडी, चंदननगरसह नगर रस्त्यावर, अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी अतिशय धोकादायक असून, रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, त्याचबरोबर रस्त्यातील असलेली चेंबरची झाकणे वर-खाली झाली असून, त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका असून, जी घटना मुंढव्यात घडली तशीच परिस्थिती वडगावशेरी, चंदननगर परिसरातील रस्त्यांची आहे. त्यामुळे या रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.रस्त्याची पाहणी करणारयाबाबत नगर रोड क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग पाचचे अधिकारी ज्ञानेश्वर लाखे यांनी सांगितले, की कल्याणीननगर येथील रस्त्याची पाहणी केली जाईल. त्यांनतर मॅनहोल्सची दुरुस्ती करणार आहे. नगर रस्त्यावरील मेनहोल्स संदर्भात संबंधित अधिकाºयांना माहितीकळवली जाईल. त्यानंतर त्याची दुरुस्ती करण्यातयेणार आहे. 

टॅग्स :Puneपुणेroad safetyरस्ते सुरक्षा