शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्याविरुद्ध मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 22:31 IST

 पुणे : पूर्वीच्या वादातून बांबूने दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ ही घटना सातारा रोडवरील शंकर महाराज मठासमोर शनिवारी रात्री नऊ वाजता घडली़. 

ठळक मुद्देदीक्षित यांच्याविरुद्ध अनूसुचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे़.राजेंद्र शिळीमकर, अनंत तंवर, गिरीश क्षीरसागर, निलेश देगावकर (सर्व रा़ धनकवडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़

 पुणे : पूर्वीच्या वादातून बांबूने दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. ही घटना सातारा रोडवरील शंकर महाराज मठासमोर शनिवारी रात्री नऊ वाजता घडली़. राजेंद्र शिळीमकर, अनंत तंवर, गिरीश क्षीरसागर, निलेश देगावकर (सर्व रा़ धनकवडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़ याप्रकरणी शैलेंद्र प्रभाकर दीक्षित (वय ४७, रा़ पुण्याईनगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. दीक्षित यांच्याविरुद्ध अनूसुचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे़.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेंद्र दीक्षित हे शनिवारी रात्री शंकर महाराज मठासमोर आले असताना जुन्या वादाचा राग मनात धरुन आरोपींनी बांबूने, दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले़. दीक्षित यांच्या फिर्यादीवरुन चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. दीक्षित यांच्याविरुद्ध आनंद आत्माराम तौर (वय २०, रा़ शंकर महाराज वसाहत, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे़. शैलेंद्र दीक्षित यांनी शंकर महाराज मठासमोरील २० रुपयात पोटभर जेवण या स्टॉलमधील कामगारांना शिवीगाळ केल्याने आनंद तौर यांनी शिवीगाळ करण्याचे कारण विचारले असता त्यांना हाताने मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केली, अशी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. सहायक पोलीस निरीक्षक व्ही़ बी़ कोळी अधिक तपास करीत आहेत़. 

टॅग्स :PuneपुणेSahakar NagarसहकारनगरPolice Stationपोलीस ठाणे