शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयातच तोंडी तलाक देणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 16:07 IST

मेरी दुसरी शादी तय हो चुकी है, मै दुसरी शादी करनेवाला हूॅ़, इसलिए मै तुझे तलाक देता हूँ...

ठळक मुद्देयाप्रकरणी लष्कर पोलिसांनी पतीविरुद्ध मुस्लिम वुमन अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल सुनावणीस न्यायालयात आल्या असताना पतीने त्यांना तोंडी तलाक देण्याचा प्रकार समोर

पुणे : घरगुती वादातून पत्नीने कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याच्या सुनावणीस न्यायालयात आल्या असताना पतीने त्यांना तोंडी तलाक देण्याचा प्रकार समोर आला आहे़. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी पतीविरुद्ध मुस्लिम वुमन अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे़. हा प्रकार लष्कर न्यायालयाच्या परिसरात १७ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडला होता़. याप्रकरणी कोंढवा बुद्रुक येथील ३० वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, या महिलेचा सनी याच्याबरोबर २०१५ साली विवाह झाला होता़. विवाहानंतर आरोपीचे आई वडिल, बहीण व नंणद यांनी घरगुती कारणावरुन तसेच एटीएम कार्ड परत घेतल्याच्या कारणावरुन तिला मारहाण केली़. तिला त्रास देऊ लागल्याने तिने कोंढवा पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली ४९८ कलमाखाली फिर्याद दिली होती. या केसची १७ डिसेंबर रोजी लष्कर न्यायालयात सुनावणी होती. त्यासाठी त्या आल्या होत्या. न्यायालयाच्या परिसरात त्या असताना तिचा पती व इतर त्यांच्याकडे आले़. तेव्हा त्यांच्या पतीने 'तुमने  हमारे खिलाफ केस करके अच्छा नही किया़;  हम कोर्टमे चक्कर मार रहे है़, लेकीन उसे हमे कुछ फरक नही़, तुझे किसके पास जाना है जा़, लेकिन मेरे घरवाले तुझे रखनेवाले नही़, तु कुछ भी कर, मेरी दुसरी शादी तय हो चुकी है, मै दुसरी शादी करनेवाला हूॅ़, इसलिए तु मेरे कुछ कामकी नही है, इसलिए मै तुझे तलाक देता हूँ, असे म्हणून त्यांना बेकायदेशीर तलाक दिला़. तसेच तेथून जाताना त्यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली आहे़. या महिलेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. तोंडी तलाक विरोधी कायदा झाल्यानंतर अशा प्रकारे तलाक दिल्याने गुन्हा दाखल झालेला हा पुण्यातील दुसरा प्रकार आहे़. 

टॅग्स :Puneपुणेtriple talaqतिहेरी तलाकCourtन्यायालयMuslimमुस्लीमWomenमहिला