शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे वचन देऊन ठेवले अनैतिक संबंध; लेफ्टनंट कर्नलची आत्महत्या, ब्रिगेडियरवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 08:33 IST

पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या लेफ्टनंट कर्नल महिलेशी अनैतिक संबंध ठेवले. नंतर अश्लील फोटो व व्हिडिओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याने महिलेने आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पुणे : पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या लेफ्टनंट कर्नल महिलेशी अनैतिक संबंध ठेवले. नंतर अश्लील फोटो व व्हिडिओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याने महिलेने आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी महिलेचे वरिष्ठ लष्करी अधिकारी बिग्रेडियर अजित मिलू (सध्या रा. बिग्रेडियर जनरल स्टाफ, हेड क्वॉटर्स, आर्मी ट्रेनिंग कमांड, सिमला, हिमाचल प्रदेश) याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येची घटना वानवडीतील ऑफिसर मेसमध्ये १३ ऑक्टोबर रोजी घडली होती. हा प्रकार २०१९ पासून १२ ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला होता. लेफ्टनंट कर्नल असलेल्या ४२ वर्षांच्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांचे पती जयपूर येथे लष्करी सेवेत असून, या घटनेनंतर ते पुण्यात आल्यावर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.काही महिन्यांपासून प्रशिक्षणासाठी त्या सिमल्याहून पुण्यात आल्या होत्या. बिग्रेडियर मिलू यांच्या धमक्यांना घाबरून त्यांनी १३ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली. वानवडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली होती. आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मिलूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लग्नाचे वचन देऊन ठेवले अनैतिक संबंधलेफ्टनंट कर्नल असलेली ही महिला सिमला येथे कार्यरत होती. या काळात २०१९ पासून त्यांचे वरिष्ठ अधिकारी बिग्रेडियर अजित मिलू यांनी गैरफायदा घेऊन त्यांच्याशी प्रेमाचे नाटक केले. लग्नाचे वचन देऊन त्यांच्याशी अनैतिक संबंध ठेवले. त्यांचे अश्लील फोटो व व्हिडिओ बनवून ते व्हायरल करून या महिलेला ते बदनामी करण्याची धमकी देत असत.