शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बालमित्रांना ‘कार्निवल’ची मेजवानी!

By admin | Updated: April 14, 2015 23:38 IST

नाहीये ना! घाबरू नका रे, तुम्हा बालमित्रांच्या सुट्टीचे फुल टू प्लॅनिंग आणि धमाल घेऊन लोकमत बाल विकास मंच घेऊन आला आहे ‘

पुणे : परीक्षा संपली आता सुट्टीची चाहूल लागली. सुट्टीत धमाल करायचे पण कुठे जायचं आणि काय करायचे हे कळत नाहीये ना! घाबरू नका रे, तुम्हा बालमित्रांच्या सुट्टीचे फुल टू प्लॅनिंग आणि धमाल घेऊन लोकमत बाल विकास मंच घेऊन आला आहे ‘लोकमत किड्स कार्निवल २०१५’. धमाल, मजा-मस्तीचा आनंद आणि त्याबरोबरच वेगवेगळे वर्कशॉप असा दुहेरी संगम साधणारा हा किड्स कार्निवल बच्चे कंपनींची सुट्टी मजेशीर करणार आहे. येत्या १५ एप्रिल ते १९ एप्रिल दरम्यान सकाळी ११ ते ९ या वेळेत या कार्निवलमध्ये चिमुकल्यांना सहभागी होता येणार आहे.कुमार पॅसिफीक मॉल, शंकरशेठ रस्ता, स्वारगेट येथे होणार आहे. यावेळी विविध वर्कशॉप घेण्यात येणार आहेत. यामध्ये डान्स, स्कील्स् डेव्हलपमेंट, कराटे/सेल्फ डिफेन्स, पेंटींग अ‍ॅन्ड क्ले मॉडेलिंग, गिटार अ‍ॅन्ड सिंथेसायझर, आर्ट अ‍ॅन्ड क्राफ्ट, मॅजिक ट्रीक्स, फोटोग्राफी अशा विविध प्रकारचे पाच दिवसांचे वर्कशॉप असणार आहे. मुलांना मौजमजा करण्याबरोबरच विविध कलागुण शिकण्याची संधी या वर्कशॉपमधून मिळणार आहे. याशिवाय शूटींग, आर्चरी, डार्ट, प्लेस्टेशन, बाऊंसी(कॅसल), वॉटरबॉल (वॉटर झॉर्बी), ट्रेन, बुल राईड, बन्जी जम्पींग अशा प्रकारे भरपूर खेळ ही खेळता येणार आहेत. सध्या इंग्रजीच्या स्पेलींगमध्ये बरीच मोडतोड होताना दिसते. मुलांना योग्य स्पेलिंग माहित असावे या अनुषंगाने १६ एप्रिल रोजी ‘स्पेल बी’ ही स्पेलिंगशी निगडीत स्पर्धा होणार आहे तर याच दिवशी मुलांच्या बुद्धिमत्तेचा कस लावणारी ‘क्वीझ कॉन्टेस्ट’ ही होणार आहे. नोंदणी आवश्यकया कार्निवलमध्ये बालविकास मंचच्या सभासदांना ओळखपत्र दाखवून वर्कशॉपमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे. तर इतर चिमुरड्यांना सहभागी होण्यासाठी एका वर्कशॉपसाठी १०० रूपये नोंदणी फी राहणार आहे तर सर्व वर्कशॉपसाठी ५०० रूपये नोंदणी फी राहणार आहे. वर्कशॉपबरोबरच अनलिमिटेड खेळांचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्यासाठी ५०० रूपये फी राहणार आहे. छोटा भीम, चुटकी आणि भेटवस्तूखेळ आणि वर्कशॉपबरोबरच मुलांना कार्टुन जगातील प्रसिद्ध छोटा भीम आणि चुटकी यांच्याबरोबरही धमाल करण्याची विशेष संधी मिळणार आहे. तसेच या कार्निवलमध्ये लहानग्यांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आला आहे. दर तासाला एक लकी ड्रॉ काढला जाणार असून विजेत्याला गेमींग कुपन्स जिंकता येणार आहे.