शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सावधान..! न्यायालयात अस्वच्छता करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 18:15 IST

न्यायालयात येणाऱ्या पोलीस, वकिल, न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकार यांनी या पुढे आपल्याकडून न्यायालय परिसर अस्वच्छ होणार नाही याची काळजी घ्यावी.

पुणे : न्यायालय आवारात धुम्रपान करुन, पान, गुटखा, तंबाखू, खावून अस्वच्छता करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात यावी या संदर्भात पुण्यातील वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती व प्रमुख जिल्हा न्यायाधीश, पुणे यांना निवेदन दिले होते. सामाजिक जबाबदारी म्हणून या निवेदनाची गंभीर दखल घेत पुणे प्रमुख जिल्हा न्यायाधीश, यांनी एक परिपत्रक काढले असून यापुढे न्यायालय आवारात धुम्रपान करुन, पान, गुटखा, तंबाखू, खावून अस्वच्छता करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.

न्यायालय हे ठिकाण पवित्र मानले जातं आणि म्हणून न्यायालयाचा परिसर स्वच्छ आणि सुंदर असायला पाहिजे.  न्यायालय आवारात धुम्रपान करुन, पान, गुटखा, तंबाखू, खावून अस्वच्छता करणाऱ्या व्यक्तिंवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. हे परिपत्रक पुणे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांसाठी काढण्यात आले आहे.        न्यायालय आवारात अस्वच्छता करणारांवर कारवाई करता यावी यासाठी पोलीस आणि शिपाई यांच्यासोबतच १० तरुण वकिलांची टिम तयार करण्यात आली आहे. यामध्ये  अ‍ॅड. विकास शिंदे, अ‍ॅड. प्रतिक जगताप, अ‍ॅड. उत्तम ढवळे, अ‍ॅड. सोमनाथ भिसे, अ‍ॅड. किशोर जायभाय, अ‍ॅड. अनिल जाधव, अ‍ॅड. प्रताप मोरे, अ‍ॅड. विजय कुंभार, अ‍ॅड. सुजाता कुलकर्णी आणि अ‍ॅड. दिप्ती राजपूत यांचा समावेश करण्यात आला आहे.न्यायालय परिसरात अस्वच्छता केल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित व्यक्तिला ३ महिन्यांपर्यंत शिक्षा किंवा २ हजार रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते.           त्यामुळे न्यायालयात येणाऱ्या पोलीस, वकिल, न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकार यांनी या पुढे आपल्याकडून न्यायालय परिसर अस्वच्छ होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे न्यायालयात येणाऱ्या पोलीस, वकिल, न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकार यांनी या पुढे आपल्याकडून न्यायालय परिसर अस्वच्छ होणार नाही याची काळजी घ्यावी...

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयSmokingधूम्रपानadvocateवकिल