शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

करिअर रेडिओ खगोलशास्त्रातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:09 IST

: रेडिओ खगोलशास्त्रातील करिअरच्या संधी : रेडिओ खगोलशास्त्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्याचे प्रामुख्याने दोन भाग आहेत. एक ...

: रेडिओ खगोलशास्त्रातील करिअरच्या संधी :

रेडिओ खगोलशास्त्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्याचे प्रामुख्याने दोन भाग आहेत. एक वैज्ञानिक संशोधन क्षेत्र व दुसरे अभियांत्रिकी/तांत्रिक प्रणाली/इंस्टमेशन क्षेत्र,

१. वैज्ञानिक संशोधन क्षेत्रातील करिअरच्या संधी

१. जेईएसटी-पीएच.डी आणि इंटिग्रेटेड पीएच.डी हे दोन्ही प्रोग्रामसाठी एक सामान्य परीक्षा घेतली जाते. ज्यांना एमएससी (फिजिक्स),बीई नंतर पीएच.डी आणि इंटिग्रेटेड पीएचडी करायची आहे. त्यांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी आयआयए, आयआयएससी. आयएमएससी. आयसीटीएस-टीआयएफआर,आयुका, जेएनसीएएसआर , एनसीआरए-टीआयएफआर, टीआयएफआर-टीसीआयएस, आरआरआय, आयसर मोहाली,आयसर- पुणे, आयपीआर, एनसीबीएस, एनआयएएसईआर या सर्व संस्थांमध्ये प्रवेश करून अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात.

२. टीआयआरएफ या संस्थेसाठी एक स्वतंत्र जीएस-परीक्षा घेऊन पीएचडी आणि इंटिग्रेटेड पीएचडी या दोन्ही प्रोग्रामसाठी प्रवेश दिला जातो. तसेच जीईएसटी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी देखील पात्र ठरतात. रिसर्च स्कॉलर प्रोग्रॅममध्ये एनसीआरएच्या प्राध्यापकांसमवेत संशोधन प्रकल्पात काम करण्यासाठी तेजस्वी प्रवृत्त विद्यार्थ्यांची निवड केली जाते. ज्यामुळे शेवटी विद्यार्थी संशोधक म्हणून प्रशिक्षित होतो आणि पीएच.डी पदवी मिळते. जागांची संख्या मर्यादित असल्याने अनेक स्क्रीनिंग प्रक्रिया राबवली जाते. लेखी चाचण्यांद्वारे निवड केली जाते. जी वर्षभरात मूलभूत भौतिकशास्त्र आणि गणिताची चिंता करणाऱ्या इच्छुकांसाठी आययूसीए-एनसीआरए प्रवेश परीक्षा (आयएएनएटी), संयुक्त प्रवेश स्क्रीनिंग टेस्ट (जेईएसटी), टीआयएफआर चाचणी

आणि व्हिजिटिंग स्टुडेंट रिसर्च प्रोग्रामच्या (व्हीएसआरपी) माध्यमातून आहेत.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *वैज्ञानिक अधिकारी

मुख्य संशोधन कार्यासाठी लागणारे मुख्य यांत्रिकीकरण किंवा इतर वैज्ञानिकिकरण जे, कि संशोधन कार्यासाठी अतिमहत्त्वाचे असते. त्यासाठी वैज्ञानिक अधिकारी यांची गरज भासते. वैज्ञानिक अधिकारी यांची निवड त्यांची शैक्षणिक पात्रतेनुसार होत असते. ज्यांनी संबंधित विषयात एमएससी, बीई किंवा पीएचडी केली असून त्यांना त्या कार्यचा अनुभव देखील आहे, अशा विद्यार्थ्यांची निवड त्वरित होते. त्याचप्रमाणे संशोधन सहयाकासारखे पद मिळविण्यासाठी बीएससी (फिजिक्स) ही पदवी घेऊन डेटा अॅनालिसिस व रेडिओ दुर्बीण प्रणाली संचालन या क्षेत्रात िकरिअर करता येऊ शकते.

३. इंजिनिअरिंग/तांत्रिक प्रणाली/ इंस्ट्रमेंशन क्षेत्रातील करिअरच्या संधी :

रेडीओ दुर्बिणीमध्ये अनेक तांत्रिक प्रणाली कार्यरत असतात. संशोधन करण्यासाठी अभियांत्रिकी प्रणालीची गरज असते. त्यासाठी तांत्रिक प्रणाली विकसित करणे त्याची देखभाल करणे, याबाबतचे सर्व कार्य, प्रणाली अद्ययावत करण्यासाठी अभियंत्यांची गरज भासते. त्यामुळे या क्षेत्रात अभियंता, सहायक अभियंता किंवा वरिष्ठ अभियंता म्हणून करिअरच्या संधी उपलब्ध असतात.

* विद्यार्थ्यांसाठी संधी

स्टुडन्ट ट्रेनिंग प्रोग्रॅम : संशोधन प्रशिक्षणार्थी प्रोग्राममध्ये, अभियांत्रिकी आणि भौतिकशास्त्र या दोहोंसाठी योग्यता दर्शविणारे अत्यधिक प्रवृत्त विद्यार्थी निवडले जातात. प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू होणारे हे विद्यार्थी एक वर्षाचा प्रशिक्षण कार्यक्रम घेतात. त्यानंतर एनसीआरएमध्ये नियमित स्टाफ मेंबर बनतात. तसेच नंतर ते अ‍ॅस्ट्रोफिजिक्समध्ये डॉक्टरेट पदवी (पीएच.डी) घेताना जीएमआरटीमध्ये अभियांत्रिकी कार्यात योगदान देतात. या कार्यक्रमाची जाहिरात दोन वर्षांत साधारणपणे एकदा केली जाते.

* व्हिसिटिंग रिसर्च स्टुडंट प्रोग्रॅम -

इच्छुक विद्यार्थ्यांना अल्प मुदतीच्या कार्यक्रमांच्या श्रेणीमध्ये एनसीआरए नियमितपणे व्हिजिटिंग स्टूडंट रिसर्च प्रोग्राम (व्हीएसआरपी), स्टुडंट ट्रेनिंग प्रोग्राम (एसटीपी) आणि रेडिओ अ‍ॅस्ट्रॉनॉमी विंटर स्कूल (आरएडब्ल्यूएससी) नियमितपणे चालवते. व्हीएसआरपी हा दोन महिन्यांचा कार्यक्रम असून तो दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये चालतो. त्यात प्रास्ताविक व्याख्याने व अ‍ॅस्ट्रोफिजिक्समधील प्रोजेक्टचा समावेश असतो.

प्रोजेक्ट बेसिस ट्रेनिंग प्रोग्रॅम : जेव्हा प्रकल्प उपलब्ध होतात. तेव्हा अभियांत्रिकी कर्मचारी किंवा प्राध्यापकांद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाते.या प्रकल्पांचा कालावधी दोन महिन्यांपासून सहा महिन्यांपर्यंत असू शकतो.

: रेडीओ खगोलशात्रीय अभ्यासक्रमीय शिक्षण व करिअरच्या संधी देणाऱ्या काही महत्त्वाच्या संस्था/विद्यापीठ पुढीलप्रमाणे :

१. राष्ट्रीय रेडिओ खगोलशास्त्र केंद्र, पुणे

२ टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई

३) रेडिओ खगोलशास्त्र केंद्र, उटी, तमिळनाडू

४) इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी अँड ऍस्ट्रोफिजिक्स, पुणे

५) भौतिक अनुसंधान प्रयोगशाळा, अहमदाबाद

६) रमण संशोधन संस्था, बंगळुरू

७) भारतीय विज्ञान संस्थान, बंगळुरू

८) भारतीय ताराभौतिकी संस्थान, बंगळुरू

९) स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड

१०) मदुरै कामराज विद्यापीठ, मदुराई, तमिळनाडू

११) आंध्र विद्यापीठ, विशाखापट्टणम

१२) पंजाबी विद्यापीठ,पटियाला, पंजाब

१३) जवाहर लाल नेहरू तंत्रज्ञान विद्यापीठ, अभियांत्रिकी महाविद्यालय, हैदराबाद

१४) महात्मा गांधी विद्यापीठ, कोट्टायम, केरळ

१५) एमपी बिर्ला तारामंडल, कोलकाता

१६) उस्मानिया विद्यापीठ, खगोलशास्त्रातील प्रगत अभ्यास केंद्र, हैदराबाद

* नोकरीच्या संधी-करिअर

: प्रॉस्पेक्ट्स:

अस्ट्रॉनॉमीचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर, ज्या युवकांना अवकाशातील रहस्ये जाणून घेण्याची तसेच त्यात करियर घडवायची इच्छा आहेत त्यांच्यासाठी भरपूर संधी आहेत. रेडिओ खगोलशास्त्रज्ञांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या क्षेत्रात करियर करणाऱ्यांना भौतिकशास्त्र व गणित यामध्ये रूची असणे आवश्यक आहे. खगोलशास्त्र एक व्यापक क्षेत्र आहे. या शास्त्रांच्या विविध शाखा असून युवकांना त्यांच्या आवडीनुसार शाखा निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. खगोलशास्त्रात करिअर करणारे विद्यार्थी ही या क्षेत्रात राहून देशाची सेवा करू शकतात.

अनेक संशोधन संस्था आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था (डीआरडीओ) यासारख्या बड्या सरकारी संस्थांकडे संशोधन वैज्ञानिक म्हणून नियुक्त होऊ शकता.

- डॉ. जे. के. सोळंकी, वरिष्ठ अधिकारी, जीएमआरटी, एनसीआरए टीआयएफआर, पुणे