शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

कऱ्हा नदीपात्र झाले चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 02:43 IST

नदीपात्राची स्वच्छता; खंडोबानगर ते म्हाडा कॉलनीदरम्यान राबविले अभियान

बारामती : बारामती येथील कºहा नदीपात्रातील स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नदीपात्रातील काटेरी झुडपे, तसेच प्रवाहात अडथळा ठरणारा राडारोड साफ करण्यात आला; त्यामुळे शहरातील नदीपात्र चकाचक झाले आहे.१६ ते २२ जुलैदरम्यान नगरसेवक अमर धुमाळ मित्रपरिवाराच्या वतीने या स्वच्छता सप्ताहाचे अयोजन करण्यात आले होते. स्व:खर्चाने चार वर्षांपासून ही मोहीम राबवली जात आहे. या पार्श्वभूमीवर, स्वच्छता मोहिमेची सुरुवात नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या हस्ते करण्यात आली. बारामती शहरातून वाहणाऱ्या कºहा नदीपात्रात दरवर्षी झाडे व इतर कचरा होत असल्याने नदीपात्र अस्वच्छतेच्या विळख्यात सापडते. बारामती शहरातील खंडोबानगर येथील कºहा नदीवरील पूल ते म्हाडा कॉलनीदरम्यान नदीपात्रात बाभळी व इतर काटेरी वनस्पतींचे साम्राज्य वाढले आहे.नदीला पूर आल्यास पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन पाणी पात्रालगतच्या घरांमध्ये घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही. याअनुषंगाने अमर धुमाळ यांनी या स्वच्छता अभियानाला सुरुवात केली आहे. त्यामुळे चार वर्षांपूर्वी अमर धुमाळ मित्र परिवाराच्या वतीने स्वखर्चाने जेसीबी यंत्राच्या साह्याने ही स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली.कºहा नदीपात्रासह बारामती शहरातील अनेक भागांत ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन नदीपात्रासह इतर भाग चकाचक झाला.यावेळी नगरसेवक अमर धुमाळ यांनी सांगितले, की माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हाउपक्रम सुरू केला आहे. या स्वच्छता अभियानाचे हे पाचवे वर्ष आहे.नदीमध्ये अस्वच्छता, झाडेझुडपे आणि घाणीचे साम्राज्य पसरले होते. पर्यावरणीयदृष्टीने नदीची स्वच्छता आणि नदीचे आरोग्य अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे वारंवार अशा स्वरुपाच्या स्वच्छता मोहिमेची आवश्यकता आहे. नदीपात्राची स्वच्छता राखली गेल्यास सर्वांनाच शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ शकतो. पाणी जेवढे स्वच्छ राहील तेवढेच आसपासच्या नागरिकांचे आरोग्यही उत्तम राहील.

टॅग्स :Puneपुणेriverनदी