दावडी : खरपुडी (ता. खेड) येथील आंबेओहळ पुलाचे कठडे तोडून एक कार वीस फूट खोल ओढ्यात कोसळली. यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.
खरपुडी बुद्रुक आंबेओहळ येथील ओढ्यावर नव्याने पूल उभारण्यात आला आहे. ज्या ठिकाणी धोका आहे त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने संरक्षक कठडे लावले नाहीत. निमगाव खंडोबाकडून येणाऱ्या रस्त्याच्या बाजूने उतार आहे. त्यामुळे त्या बाजूने वाहनांना कायम वेग असतो. दि. ३ रोजी दुपारी १२ च्या सुमारास एका कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पुलाचे कठडे तोडून २० फूट ओढ्यात कोसळली. स्थानिक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन कोसळली कार सरळ करून चालकाला बाहेर काढले व पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या अपघातामध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पुलाच्या ठिकाणी दोन्ही बाजूने उतार असल्याने वाहने वेगाने येत असतात. या पुलाला धोकादायक ठिकाणी दोन्ही बाजूने संरक्षक बसवावेत, अशी मागणी खरपुडीचे सरपंच माजी सरपंच विलास चौधरी पाटील यांच्यासह ग्रामस्थ व वाहनचालकांनी केली आहे.
फोटो : खरपुडी (ता. खेड) येथील ओढ्यात कोसळलेली कार.