शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेची आठ लाख कोरोना प्रतिबंधक लस साठवण्याची क्षमता; आरोग्य प्रमुखांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 11:51 IST

कोरोना लसीचे लसीकरण हे मतदान बूथप्रमाणे (३ रूम असलेले) करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपुणे महापालिकेच्या सर्व रूग्णालयांमध्येलस साठवण्याची व्यवस्था

पुणे : कोरोनावर येऊ घातलेल्या लस कशारितीने द्यायच्या याचे प्रशिक्षण आरोग्य क्षेत्रातील सेवकांना देतानाच, पुणे महापालिकेने लस साठवणुक क्षमतेचीही मोठ्या प्रमाणात निर्माण केली आहे. आजमितीला पुणे महापालिकेने आठ लाख लस साठवणूक ठेवता येईल एवढ्या डीपफ्रिजरची व्यवस्था केली आहे.     पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ.आशिष भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने ७० आय.एल.आर. (५ हजार लिटर) व ४० डीप फ्रिजर यामध्ये ८ लाख लस साठवणूक करता येईल अशी व्यवस्था केली आहे. पुणे महापालिकेच्या सर्व रूग्णालयांमध्ये ही व्यवस्था करण्यात आली आहे.    कोरोना लसीचे लसीकरण हे मतदान बूथप्रमाणे (३ रूम असलेले) करण्यात येणार आहे. यामध्ये ५ सेवकांची एक टीम कार्यरत राहणार आहे. यात १ लस टोचक व १ सुरक्षारक्षक असणार आहे. मतदान प्रक्रियेप्रमाणे लसीकरण मोहिम पार पडणार असून, लसीकरणाच्या पोर्टलवर नाव असलेल्या व नोंदणीकृत ओळखपत्र असलेल्यांनाच लस देण्यात येणार आहे. तसेच ज्यावेळेस सर्व सामान्य नागरिकांना लसीकरण खुले करण्यात येईल. त्यावेळी मोबाईल अ‍ॅपव्दारे संबंधितांना माहिती भरता येणार आहे.    कोविड-१९ ची लस टप्प्या-टप्प्याने देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय सेवा देणारे सर्व कर्मचारी यांना, दुसऱ्या टप्प्यात पुणे महापालिका, पोलिस दल, गृहरक्षक अधिकारी व नागरी संरक्षण दल अधिकारी कर्मचारी यांना तर तिसऱ्या टप्प्यात जोखीम ग्रस्त व्यक्ती (५० वर्षावरील व व्याधी असलेले) यांना लस देण्यात येणार आहे. तर चौथ्या टप्प्यात सर्व सामान्य नागरिकांना लस देण्यात येणार आहे.    पुणे महापालिकेकडे आजमितीला वैद्यकीय सेवा देणाऱ्या सरकारी व खाजगी अशा ४५ हजार १४३ जणांची नोंदणी करण्यात आलेली असल्याची माहितीही डॉ़भारती यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीMayorमहापौर