शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
3
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
4
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
5
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
6
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
7
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
8
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
9
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
10
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
11
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
12
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
13
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
14
Katrina Kaif-Vicky Kaushal Baby: गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
15
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
16
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
17
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
18
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
19
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
20
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात

‘कॅप’च्या विद्यार्थ्यांना दिलासा; चुका करणार्‍या महाविद्यालयांना दुप्पट दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 14:41 IST

‘कॅप’च्या आॅनलाईन प्रक्रियेत नावनोंदणी न केलेल्या महाविद्यालयांना दंड आकारून संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश ग्राह्य धरण्याचा तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे.

ठळक मुद्देसंस्था स्तरावरील प्रवेशाची आॅनलाईन नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले जाणारविद्यार्थ्यांची चूक नसल्याने संस्थांना दंड आकारून नोंदणीची संधी देण्यात आली आहे. राज्यभरात असे शंभराहून अधिक विद्यार्थी.

पुणे : अभियांत्रिकीच्या पदविका अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत (कॅप) प्रवेश निश्चित होवून महाविद्यालयांच्या निष्काळजीपणामुळे डोक्यावर टांगती तलवार असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. आॅनलाईन प्रक्रियेत नावनोंदणी न केलेल्या महाविद्यालयांना दंड आकारून संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश ग्राह्य धरण्याचा तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे.दहावी व बारावीनंतर प्रथम वर्ष पदविका आणि थेट द्वितीय वर्ष दहावीनंतर पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेमध्ये ‘कॅप’ फेर्‍यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात आले आहेत. ‘कॅप’ गुणवत्ता यादी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जावून प्रवेश निश्चित करणे आवश्यक असते. त्यानुसार महाविद्यालयाकडून संबंधित विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी करून प्रवेश अंतिम करणे बंधनकारक असते. महाविद्यालयाकडून आॅनलाईन नोंदणी केल्याशिवाय संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश अंतिम होत नाही. मात्र, अनेक महाविद्यालयांकडून यामध्ये हलगर्जीपणा झाल्याचे समोर आले आहे. सुमारे शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना याचा फटका बसला होता.आॅनलाईन नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश ग्राह्य धरले जात नाहीत. त्यामुळे महाविद्यालयांच्या चुकीमुळे संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती होती. विद्यार्थ्यांची चूक नसतानाही त्यांना प्रवेशास मुकावे लागू नये यासाठी प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या बैठकीत संबंधित विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महाविद्यालयांना संबंधित विद्यार्थ्यांची आॅनलाईन प्रवेश नोंदणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित महाविद्यालयाकडून प्रति विद्यार्थी ६ हजार रूपये दंड घेतला जाणार आहे. ही रक्कम विद्यार्थ्यांकडून वसुल न करता संस्थेने स्वत: भरावी, असे संचालनालयाने स्पष्ट केले आहे. विनानुदानित संस्थासोबत शासकीय व अशासकीय अनुदानित संस्थांनाही हा दंड भरावा लागणार आहे. या नोंदणीसाठी दि. १७ आॅक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, कॅप फेरी व्यतिरिक्त संस्था स्तरावरील प्रवेशाची आॅनलाईन नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश मात्र रद्द केले जाणार आहे. संस्थांनी निष्काळजीपणा केल्यामुळे काही विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले नाहीत. आॅनलाईन नोंदणी न झाल्यामुळे या विद्यार्थ्यांचे प्रवेश ग्राह्य धरले जाणार नव्हते. यात विद्यार्थ्यांची चूक नसल्याने संस्थांना दंड आकारून नोंदणीची संधी देण्यात आली आहे. राज्यभरात असे जवळपास शंभराहून अधिक विद्यार्थी असतील.- दयानंद मेश्राम, सहसंचालक, तंत्रशिक्षण संचालनालय

टॅग्स :Studentविद्यार्थीPuneपुणे