शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

जात वैधता प्रमाणपत्राची अट रद्द करा; पुणे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे, इच्छुकांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 13:26 IST

सध्या जातपडताळणी समितीकडे दाखल्याचे प्रचंड काम असून, अर्ज केल्यानंतर वेळेवर प्रमाणपत्र मिळत नाही. यामुळे  ही अट रद्द करावी अशा मागणीची अनेक निवेदने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर होत आहेत.

ठळक मुद्देग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक, २५ फेब्रुवारी रोजी मतदानराज्यातील ३१७ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक

पुणे : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये आरक्षित जागेवरून निवडून आलेल्या संबंधित उमेदवाराला सहा महिन्यांत जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली होती. परंतु निवडणूक आयोगाने प्रथमच राज्यात होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जासोबतच जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या जातपडताळणी समितीकडे दाखल्याचे प्रचंड काम असून, अर्ज केल्यानंतर वेळेवर प्रमाणपत्र मिळत नाही. यामुळे  ही अट रद्द करावी अशा मागणीची अनेक निवेदने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर होत आहेत. सदरील निवेदन हे निवडणूक विभागाकडे पाठविले जात असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.  राज्यातील फेबु्रवारी-मार्चमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक आणि रिक्त असलेल्या सदस्यांच्या जागांसाठी २५ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. यातील पोटनिवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे अर्ज प्रत्यक्ष स्वीकारले जाणार होते. मात्र, त्यात सुधारणा करण्यात अली असून आता इच्छुकांना आॅनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहते. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायती आणि पोट निवडणुकांसाठी २२ जानेवारीला आचारसंहिता लागू केली आहे. राज्यातील ३१७ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक आणि ४ हजार १०१ ग्रापंचायतींमधील ६ हजार ८७१ रिक्त जागांसाठी २५ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. परंतु आयोगाच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या अटीमुळे सध्या इच्छुक उमेदवारांची प्रचंड धावपळ सुरू असून, केवळ हे प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्याने अनेक इच्छुक निवडणुकीपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Saurabh Raoसौरभ रावPuneपुणे