शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कालवा दुरूस्तीचे काम शुक्रवारी पूर्ण होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 20:21 IST

दांडेकर पूल परिसरात झालेल्या कालवा फुटीमुळे मोठी दुर्घटना घडली. मात्र, फुटलेल्या ठिकाणच्या कालवा दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू असून बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे दुरूस्तीच्या कामात अडथळे आले.

ठळक मुद्देकालवा फुटीमुळे दांडेकर पूल परिसरात राहणाऱ्या शेकडो कुटुंबांचा संसार रस्त्यावरगेल्या चार दिवसांपासून कालवा दुरूस्तीचे काम करण्यासाठी सुमारे १०० ते १२५ कर्मचारी व अधिकारी

पुणे : दांडेकर पूल परिसरात झालेल्या कालवा फुटीमुळे मोठी दुर्घटना घडली. मात्र, फुटलेल्या ठिकाणच्या कालवा दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू असून बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे दुरूस्तीच्या कामात अडथळे आले. त्यामुळे दुरूस्तीच्या कामाला एक दिवस विलंब झाला. परंतु, शुक्रवारी (दि.५) दुरूस्तीचे काम पूर्ण होईल, असा दावा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.कालवा फुटीमुळे दांडेकर पूल परिसरात राहणाऱ्या शेकडो कुटुंबांचा संसार रस्त्यावर आला. त्याचप्रमाणे खडकवासल्यातून कालव्याद्वारे इंदापूरला शेतीसाठी सोडण्यात आलेले पाणी कालवा फुटल्यामुळे बंद करावे लागले. त्यातच कालव्यातून लष्कर जलशुध्दीकरण केंद्रासाठी उपलब्ध करून दिले जाणारे पाणी बंद झाल्याने शहराच्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. काही भागात सलग दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहिला.पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता तानाजी जगताप म्हणाले, मॅकॅनिकल विभाग, जलसंपदा विभाग आणि महानगरपलिकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी फुटलेला कालवा तात्कळ दुरूस्त करण्याबाबत युध्दपातळीवर काम सुरू केले. सुमारे १०० ते १२५ कर्मचारी व अधिकारी गेल्या चार दिवसांपासून कालवा दुरूस्तीचे काम करत आहेत. गुरूवारीच कालवा दुरूस्तीचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, बुधवारी रात्री दांडेकर पूल परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे दुरूस्तीच्या कामात अडथळे निर्माण झाले.कालव्याची फुटलेली भिंत बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, तयार केलेल्या आराखड्यानुसार भिंतीच्या भोवती मातीचा भराव टाकण्याचे काम पावसामुळे पूर्ण होऊ शकले नाही. शुक्रवारी कालवा दुरूस्तीचे सर्व काम पूर्ण होईल. तसेच कालव्यात पाणी सोडण्याबाबतचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेतला जाईल, असेही जगताप यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Puneपुणेkalwaकळवा