शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

कालवा सल्लागार समितीची बैठक होणार सोमवारी : जल निर्णयाची प्रतिक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 19:27 IST

शहराच्या पाणी वापरावरुन गेले काही महिने सतत वाद घडत आहेत. त्यातच शेतीला देखील उन्हाळी आवर्तन देण्याची मागणी होत आहे.

ठळक मुद्देशहरी-ग्रामीण भागाच्या पाण्याचा वाटा होणार निश्चित उपलब्ध जलसाठ्यानुसार १५ ऑक्टोबर ते १५ जुलैचे नियोजन राज्य सरकारच्या मध्यस्थीने शहराला १३५० एमएलडी (दशलक्ष लिटर) दररोज पाणी देण्याचा निर्णय

पुणे : शहर आणि ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या कालवा सल्लागार समितीची बैठक येत्या सोमवारी (दि. २५) पुण्यामध्ये होत आहे. शहराच्या पाणी वापरावरुन गेले काही महिने सतत वाद घडत आहेत. त्यातच शेतीला देखील उन्हाळी आवर्तन देण्याची मागणी होत आहे. उपलब्ध पाण्यामध्ये शहराचा आणि जिल्ह्याचा वाटा नक्की किती असेल, हे या बैठकीत ठरेल. त्यामुळे समितीच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.  कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री अथवा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होत असते. पावसाळा संपल्यानंतर १५ आॉक्टोबररोजी उपलब्ध जलसाठ्यानुसार पिण्यासाठी, शेतीसाठी आणि उद्योगासाठीचे १५ ऑक्टोबर ते १५ जुलैचे नियोजन करण्यात येते. तसेच, २८ फेब्रुवारी रोजी उपलब्ध साठ्याच्या आधारे उन्हाळी आवर्तनाचे देखील विचार करण्यात येतो. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची बैठक होणार नाही. जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पुण्याला ८९२ एमएलडी (वार्षिक ११.५० अब्ज घनफूट) दैनंदिन पाणी वापराची परवानगी दिली आहे. शहरातील पाण्याची तब्बल ३५ टक्के गळती होते. त्यामुळे जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिलेल्या निकषानुसार महापालिकेला पाणी पुरविणे शक्य नाही. त्यामुळे राज्यसरकारने मध्यस्ती करीत शहराला १३५० एमएलडी (दशलक्ष लिटर) दररोज पाणी देण्याचा निर्णय घेतला. हे पाणी वार्षिक १७.३९ टीएमसी इतके होते. दुसरीकडे उन्हाळी आवर्तन द्यावे यासाठी काही शेतकरी उच्च न्यायालयात गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शेतीला २.८२ टीएमसी पाणी देण्याच्या हालचाली जलसंपदा विभागाने सुरु केल्या असल्याचे समजते. तसेच, पुण्याच्या देखील पाण्यात कपात केली जाणार नसल्याचे आत्ता तरी, सांगण्यात येत आहे. खडकवासला धरण साखळी प्रकल्पात शुक्रवार अखेरीस (दि. २२) १०.३१ टीएमसी पाणीसाठा आहे. बाष्पीभवनाचा वार्षिक दर हा ३ टीएमसी इतका आहे. त्यातील जवळपास २ टीएमसी पाण्याचे एप्रिल आणि मे महिन्यात बाष्पीभवन होते. हे सर्व लक्षात घेता सोमवारच्या बैठकीत नक्की काय निर्णय होतो, याकडे महापालिका आणि ग्रामीण भागातील शेतकºयांचे लक्ष लागले आहे.  

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीagricultureशेती