शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

विश्वास बसेल का ?... असा होता ४० वर्षांपूर्वीचा सातारा रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 14:57 IST

इमारती आणि उड्डाणपुलाची उभारणी : चेहरामोहरा पार बदलून गेला

पांडुरंग मरगजे - धनकवडी : हा फोटो पाहिल्यावर आपणास रामसे बंधूंच्या हॉरर चित्रपटाची आठवण येईल किंवा आपण एखाद्या गुहेत शिरल्याचा भास होईल, मात्र तसं काही नाही, हा आहे साधारण ४० वर्षांपूर्वीचा सातारा रस्ता...! आताचे बदललेले रूप पाहून कुणाचा विश्वास बसेल? आता इमारती आणि उड्डाणपुलांमुळे त्याचा चेहरामोहरा पार बदलून गेला आहे. पूर्वी लोकसंख्या कमी असल्याने आणि या भागाचा फारसा विकास झालेला नसल्याने गर्दी तुरळक असायची, पण मोकळ्या हवेत आणि हिरवाईत लोक फिरायला यायचे. आता कोरोनाच्या अघोषित बंदमुळे लोक बाहेर पडेनासे झाले आहेत. त्यामुळे निर्मनुष्य रस्ते आणि सिमेंटची जंगले ते जुने दिवस आठवतायत! सामाजिक कार्यकर्ते दिगंबर डवरी म्हणाले, ‘सातारा रस्ता सिटी प्राईडपासून कात्रजपर्यंत अशी दुतर्फा झाडं होती. अशा निसर्गरम्य परिसरामुळे ग्रामीण खेडेगावात असल्यासारखे वाटे. त्यामुळे आम्ही पुण्यातील गर्दीपासून दूर निसर्गरम्य परिसर राहण्यासाठी निवडला, मात्र आता फक्त सिमेंटचे रस्ते उरलेत. धनकवडीमधील आठवण सांगताना आदर्श मित्रमंडळाचे अध्यक्ष उदय जगताप म्हणाले, की धनकवडीला सुरुवातीच्या काळात पाण्याची फारच टंचाई होती. धनकवडीमध्ये मोडक व आहेर यांच्या दोनच विहिरी होत्या. केवळ त्याद्वारे पाणी मिळायचे.

............‘पानशेत’नंतरची धनकवडी‘धनकवडी गावच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता स्वारगेट व ऐतिहासिक कात्रजपासून अगदीच काही अंतरावर वसलेले गाव आहे. परिसराचा विकास होत गेला तसं धनकवडीचं रुप बदलत गेले. 

.............................

..

१९६१ मध्ये पानशेत धरण फुटल्यावर पुण्याच्या मध्यवस्तीतील अनेक नागरिकांनी उपनगरांचा आसरा घेतला. त्यामुळे स्वारगेटपासून दक्षिणेकडील बाजूला लोकवस्ती वाढत गेली. कलाकारांसाठी उभारलेले कलानगर या गर्दीत हरवून गेले आहे,’ असे साहित्यिक डॉ. माधव पोतदार म्हणाले. आता कोरोनाच्या दहशतीने पुन्हा एकदा तीच जुनी शांतता व  तुरळक गर्दी अनुभवयाला मिळत असल्याची या परिसरातील जुन्याजाणत्यांची भावना आहे. 

टॅग्स :Dhankawadiधनकवडी