शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

‘एमआयएम’च्या संपर्कातील कार्यकर्ते बिहारच्या प्रचारात

By admin | Updated: September 15, 2015 04:24 IST

महापालिका निवडणुकीसाठी दीड वर्षाचा कालावधी उरला आहे. एमआयएमच्या माध्यमातून महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरता येईल, अशी अपेक्षा बाळगलेले पिंपरी-चिंचवडमधील

पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी दीड वर्षाचा कालावधी उरला आहे. एमआयएमच्या माध्यमातून महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरता येईल, अशी अपेक्षा बाळगलेले पिंपरी-चिंचवडमधील काही कार्यकर्ते नेत्यांच्या संपर्कात आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे. पहिल्या टप्प्यात काही जण बिहारला रवाना झाले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने एमआयएमने हालचाली सुरू आहेत. दोन बैठका झाल्या. त्यात एमआयएममधून इच्छूक असलेल्यांची चाचपणी करण्यात आली. दीड वर्षाने महापालिका निवडणूक होत आहे. ऐन निवडणुकीच्या काळात निर्णय घेता येईल. आताच एमआयएममध्ये काम करणे अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे नेत्यांच्या संपर्कात आलेले अनेकजण निवडणुकीपूर्वी पक्षाबरोबर काम करण्याची भूमिका उघडपणे जाहीर करण्यास धजावत नाहीत. एमआयएमबरोबर काम करण्याची तयारी आहे, हे दाखवून देण्यासाठी राज्याबाहेर बिहारच्या निवडणुकीत सक्रिय सहभागाची तयारी त्यांनी ठेवली आहे. (प्रतिनिधी)-पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक परिसरात नोकरी-व्यवसायानिमित्त बिहारमधून आलेला कामगारवर्ग मोठा आहे. भोसरी, चिंचवड एमआयडीसीत छोट्या-मोठ्या कारखान्यांमध्ये काम करणारा हा कामगारवर्ग बिहार निवडणुकीतील मतदारही आहे. -कुदळवाडी, तसेच नेहरूनगर, काळेवाडी येथील मुस्लीमबहुल परिसरातील बिहारच्या लोकांकडे अधिक लक्ष दिले जात आहे. एमआयएमच्या माध्यमातून बिहारमध्ये प्रचाराचे काम करण्याची तयारी दर्शविलेल्यांना पहिल्या टप्प्यात पाठविण्यात आले आहे. -१२ आॅक्टोबरला बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होईल. त्यानुसार नियोजन करून कार्यकर्ते रवाना झाले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झालेल्या मूळ बिहारींना पुढील टप्प्यात मतदानासाठी नेले जाणार आहे. दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात ज्यांना पाठविले जाणार आहे, त्यांच्यावर येथून मतदारांना घेऊन जाण्याची जबाबदारी सोपविली जाणार आहे. -बिहारमधील विशिष्ट मतदारसंघांवर एमआयएमने लक्ष केंद्रित केले असून, त्या दृष्टीने नियोजनद्ध पावले उचलली जात आहेत. या वृत्तास एमआयएमचे काम करणाऱ्या कार्यकर्त्याने दुजोरा दिला आहे.