शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिकविरोधात मोहीम : तीन तासांत सात हजार किलो कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 03:45 IST

प्लॅस्टिकविरोधात महापालिकेने काढलेल्या लाँग मार्चमध्ये तीन तासांत तब्बल ६ हजार ८८३ किलो प्लॅस्टिक कचरा जमा करण्यात आला. प्लॅस्टिकचा वापर करू नये, यासाठी जनजागृती व्हावी म्हणून हा मोर्चा काढण्यात आला होता.

पुणे  - प्लॅस्टिकविरोधात महापालिकेने काढलेल्या लाँग मार्चमध्ये तीन तासांत तब्बल ६ हजार ८८३ किलो प्लॅस्टिक कचरा जमा करण्यात आला. प्लॅस्टिकचा वापर करू नये, यासाठी जनजागृती व्हावी म्हणून हा मोर्चा काढण्यात आला होता.महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते मंडई येथून सकाळीच मोर्चाला सुरुवात करण्यात आली. महापाालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने मोर्चाचे संयोजन केले.खासदार अनिल शिरोळे, आयुक्त सौरभ राव, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप, नगरसेवक हेमंत रासने, राजेश येनपुरे, गायत्री खडके, विजयालक्ष्मी हरिहर या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात जनवाणी व संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या स्वयंसेवकांनी पथनाट्य सादरकेले. अण्णाभाऊ साठे श्रमिक कलापथकाने प्रबोधन करणारी गाणी सादर केली.तीन तासांच्या या कचरा संकलन मोहिमेत आज सकाळी तीन तासांत ६८८३ किलो कचरा जमा झाला. त्यात ५८८० किलो प्लॅस्टिक, १७५८ किलो थर्माकोल व २२५.३ किलो ई-कचऱ्याचा समावेश होता. महापालिकेच्या सर्व आरोग्य कोठ्यांमध्ये यापुढेही दोन महिने कचरा जमा करण्यात येणार असून, नागरिकांनी त्यासाठी तिथे संपर्क साधावा, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप यांनी या वेळी केले.‘स्वत:पासून सुरुवात करावी’स्वच्छ व पर्यावरणपूरक शहराची सुरुवात प्रत्येकाने स्वत:पासून केली पाहिजे, असे महापौर टिळक म्हणाल्या. कचºयाचे व्यवस्थापन करण्यासाठी नागरिकांनी चांगले पर्याय सुचवावेत, असे आवाहन त्यांनी केले व त्या सूचनांचा प्रशासन नक्की विचार करेल, असे आश्वासन दिले. खासदार शिरोळे यांनी कोणत्याही मोहिमेत नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असतो, त्याशिवाय ती मोहीम यशस्वी होऊ शकत नाही, त्यामुळे नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर बंद करावा व या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. कचरा टाकण्यासाठी नागरिकांना पर्याय उपलब्ध करून देण्यात येतील, प्रशासनाला तशा सूचना देण्यात आल्या आहेत, असे आयुक्त राव यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPlastic banप्लॅस्टिक बंदीnewsबातम्या