शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बांग्लादेशातील भारतीय वकिलाची पुण्यात मदतीची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 14:02 IST

एका हिंदू मुलीची घेतलेली केस सोडून द्यावी याकरिता माझ्यावर दबाव आला. त्यानंतर वेळोवेळी धमकी देऊन माझ्यावर दोनवेळा प्राणघातक हल्ला देखील झाला.

ठळक मुद्देकट्टर इस्लामिक मूलतत्ववाद्यांचा वकिली व्यवसाय सोडावा याकरिता दबाव बांग्लादेशमध्ये सुमारे चार लाख वकील असून त्यापैकी तीन हजार हिंदू वकील भारताचे परराष्ट्रमंत्री, पंतप्रधान यांना पत्र लिहून याप्रकरणी लक्ष्य घालून योग्य ती कारवाईची मागणी करणार

पुणे : एका हिंदू मुलीची घेतलेली केस सोडून द्यावी याकरिता दबाव आला. त्यानंतर वेळोवेळी धमकी देऊन दोनवेळा प्राणघातक हल्ला देखील झाला. मात्र, बांग्लादेश मध्येच राहावयाचे असल्याने धमक्यांना घाबरलो नाही. अखेर राहते घर जमीनदोस्त करून २४ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेण्यात आला. त्यामुळे भाडयाच्या घरात राहावे लागत आहे...ही कैफियत आहे बांगलादेश मधील ढाका येथे वकिली व्यवसाय करणाऱ्या रवींद्र घोष यांची.. मी पत्नी आणि मुलांसह बांग्लादेश मधील ढाका येथे राहतो. बांग्लादेशमधील ढाका येथे राहत असलेले रवींद्र घोष हे वकील बुधवारी पुणे न्यायालयात वकिलांनी मदत करावी याकरिता दाखल झाले. बांग्लादेशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदू वकिलांवर अत्याचार होत असून मागील २५ वर्षापासून अधिककाळ सर्वाेच्च न्यायालयात आपण वकिली करतो. मात्र, कट्टर इस्लामिक मूलतत्ववाद्यांनी आपणावर वकिली व्यवसाय सोडावा याकरिता दबाव टाकत आहेत. माझ्याप्रमाणे इतर हिंदू वकिलांवर अत्याचार होत असून भारतीय प्रशासनाने याप्रकरणी लक्ष्य घालून बांग्लादेशातील हिंदूवरचे अत्याचार थांबवावेत अशी मागणी पत्रकारांशी बोलताना अ‍ॅड. घोष यांनी केली आहे. अ‍ॅड.घोष म्हणाले, मी पत्नी आणि मुलांसह बांग्लादेश मधील ढाका येथे राहतो. बांग्लादेशच्या सर्वाेच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुरेंद्रकुमार सिन्हा यांच्यावर ही मूलतत्ववाद्यांनी दबाव टाकून नोव्हेंबर २००७ मध्ये त्यांना राहत्या घरात बंदी बनवून त्यांच्याकडून जबरदस्तीने राजीनामा लिहून घेतला. बांग्लादेशमध्ये सुमारे चार लाख वकील असून त्यापैकी तीन हजार हिंदू वकील आहे. तर, ढाका येथील सर्वाेच्च न्यायालयात सुमारे दहा हजार वकील असून त्यापैकी २६३ हिंदू वकील असून त्यापैकी माझ्यासारख्या ५० वकिलांवर अत्याचार करण्यात येत आहे. याबाबत अधिवक्ता परिषदेचे शहर सचिव अ‍ॅड. सागर सातपुते म्हणाले, अधिवक्ता परिषदेतर्फे  बांग्लादेश मधील वकिलांवर होणा-या अत्याचाराचा आम्ही निषेध व्यक्त करतो. वकील हे न्यायालयात लोकांची बाजू मांडत असतात. त्यांना मोकळेपणाने त्यांचे काम करण्याची मुभा मिळावी. याप्रकरणी आम्ही भारताचे परराष्ट्रमंत्री, पंतप्रधान यांना पत्र लिहून याप्रकरणी लक्ष्य घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करणार आहे. ....................................

टॅग्स :PuneपुणेBangladeshबांगलादेशadvocateवकिलHinduहिंदू