शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

 कॅगकडे गैरव्यवहारांच्या तक्रारी, विद्यापीठातील लेखापरीक्षणास मुदतवाढ, स्थावर विभागावर आक्षेप नोंदविले  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 03:26 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा, स्थावर विभागातील गैरप्रकारांबाबत नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या असून याची चौकशीची मागणी करण्यात आली आहे. कॅगच्या अधिकाºयांनी याची दखल घेऊन लेखापरीक्षणास मुदतवाढ दिली आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा, स्थावर विभागातील गैरप्रकारांबाबत नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या असून याची चौकशीची मागणी करण्यात आली आहे. कॅगच्या अधिकाºयांनी याची दखल घेऊन लेखापरीक्षणास मुदतवाढ दिली आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे २०१२-२०१३ ते २०१५-१६ या आर्थिक वर्षांचे कॅगकडून लेखापरीक्षण करण्यात येत आहे. १० आॅगस्ट ते १ सप्टेंबर २०१७ या कालावधीमध्ये हे लेखापरीक्षण होणार होते. मात्र कॅगकडे आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर या लेखापरीक्षणास मुदतवाढ देण्यात आली आहे.परीक्षा विभागातील कामे मोठ्या प्रमाणात आऊटसोर्स केली जात आहेत. गेल्या १५ वर्षांपासून एका खासगी कंपनीला हॉल तिकीट, गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र यांचे प्रिंटिंग करण्याचे काम दिले आहे. या एजन्सीला कोट्यवधी रुपयांची कामे देताना ओपन टेंडर काढण्यात आलेले नाही. त्याचबरोबर आवश्यक ते सिक्युरिटी नॉर्म्स पाळण्यात आलेले नाहीत. विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचा डेटा खासगी एजन्सीकडे ठेवला जाणे गंभीर बाब असल्याचे या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.परीक्षा विभागाकडून २०१५-१६ मध्ये एका एजन्सीला १ लाख प्रामणपत्र छापण्याचे काम दिले होते. मात्र एका उपकुलसचिवांच्या चुकीमुळे ८० हजार पदवीप्रमाणपत्रे चुकीची छापली गेली. त्यानंतर ती पुन्हा नव्याने छापून घ्यावी लागल्यामुळे विद्यापीठाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्याचबरोबर कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या निवृत्तीला दीड महिना बाकी असताना त्यांनी कुलपतीमहोदयांची परवानगी न घेता पदवीप्रदान कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यामुळे या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी करण्यात आलेला काही लाखांचा खर्च वाया गेला. धार्मिक स्थळे, पुतळे यांच्या बांधकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. आदी तक्रारी यामध्ये केल्या आहेत.कॅगकडून लेखापरीक्षण केले जात असताना या बाबींची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. कॅगकडून याबाबत तपासणी केली जात आहे.फर्निचर खरेदी आणि स्क्रॅपच्या विक्रीची करा तपासणीविद्यापीठातील वैज्ञानिक उपकरणे, मशिनरी, इलेक्ट्रॉनिक वस्तू या स्क्रॅपमध्ये कवडीमोल भावात लिलावात विकण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सुस्थितीतील फर्निचर लिलावात काढून नव्याने कोट्यवधी रुपयांचे फर्निचर खरेदी केले आहे. यामुळे विद्यापीठाच्या पैशांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला असून याचीही तपासणी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.कुंपणाच्या खर्चाची चौकशी करासावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विभाग तसेच जंगलांना अनावश्यक कुंपणे घालण्यात आली आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात आल्याचे ‘लोकमत’ने उजेडात आणले. विद्यार्थ्यांना वसतिगृह, कॅन्टीनच्या चांगल्या सुविधा अद्यापही विद्यापीठाला देता आल्या नसताना हा नाहक खर्च करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. या पार्श्वभूमीवर एकंदरीत विद्यापीठात नव्याने झालेली एकूण बांधकामे, कुंपणाची कामे व त्यावर झालेला खर्च याची सखोल चौकशी करण्याची मागणी कॅगकडे करण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणे